प्रादेशिक बातम्या

December 13, 2024 4:00 PM December 13, 2024 4:00 PM

views 3

भंडारा जिल्ह्यात वाळूतस्करीविरोधात ५८३ आरोपींविरुद्ध २८६ वाळूचोरीचे गुन्हे दाखल

भंडारा जिल्ह्यात वाळूतस्करीविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ५८३ आरोपींविरुद्ध २८६ वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसंच वाळू आणि वाहनांसह ४८ कोटी ४४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा, चुलबंद, बावणथडी आणि सूर य...

December 13, 2024 3:37 PM December 13, 2024 3:37 PM

views 3

आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा २२ फेब्रुवारीला होणार आहे. २३ फेब्रुवारीला मोड यात्रेने या यात्रेची सांगता होईल. दरम्यान धार्मिक विधीसाठी मंदिर उद्या १४ डिसेंबर पर्यंत बंद असल्याचं आंगणे कुटुंबीयांनी सांगितलं.

December 13, 2024 3:29 PM December 13, 2024 3:29 PM

views 15

बांग्लादेशात अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – उद्धव ठाकरे

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविषयी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारा...

December 13, 2024 2:49 PM December 13, 2024 2:49 PM

views 10

भाजपाचं प्रदेश अधिवेशन येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनी शिर्डीत होणार

शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारीला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थितीत हे प्रदेश अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांच्या उपस्थिती असणार असल्याची माहिती भाजपचे प्...

December 13, 2024 10:27 AM December 13, 2024 10:27 AM

views 7

रत्नागिरीत माध्यमिक विद्यालयात वायूगळती, अनेक विद्यार्थ्यांना त्रास

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये काल दुपारी झालेल्या वायुगळतीमुळे एकंदर ५८ जणांना त्रास झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व व्यक्तींची प्रकृती स्थिर असून, त्यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. बाधित ५८ जणांमध्ये पाच विद्यार्थी, ५२ विद्यार्थिनी आण...

December 12, 2024 7:16 PM December 12, 2024 7:16 PM

views 13

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट म्हणून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्...

December 12, 2024 7:12 PM December 12, 2024 7:12 PM

views 10

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परभणीत केली पाहणी

परभणीमधल्या संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परभणीत जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर, दानवे यांनी नुकसान झालेल्या व्यापारी आस्थापनांची, तसंच इतर ठिकाणांची पाहणी केली....

December 12, 2024 7:04 PM December 12, 2024 7:04 PM

views 5

गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी राज्य सरकार ‘कंट्री डेस्क’ कक्ष स्थापन करणार

देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी या उद्देशाने राज्य शासनानं विविध उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी कंट्री डेस्क हा विशेष कक्ष स्थापन केला जाणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक व्यापार...

December 12, 2024 3:52 PM December 12, 2024 3:52 PM

views 10

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम

'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या 'अपार' अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी...

December 12, 2024 3:31 PM December 12, 2024 3:31 PM

views 17

वाशिम आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद

परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीच्या अवमानना प्रकरणी काल झालेल्या आंदोलनात अनेक एसटी बसचं नुकसान झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या एसटी गाड्या वाशिम आगारात थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्याहून मराठवाड्य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.