प्रादेशिक बातम्या

December 14, 2024 10:15 AM December 14, 2024 10:15 AM

views 10

११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून समारोप डॉ. आदित्य पतकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संम...

December 14, 2024 10:13 AM December 14, 2024 10:13 AM

views 13

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास...

December 13, 2024 7:40 PM December 13, 2024 7:40 PM

views 14

बीडमध्ये शिक्षकाच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप

बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

December 13, 2024 7:47 PM December 13, 2024 7:47 PM

views 12

नागपूरमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप

नागपूरच्या हिंगणा येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला. या स्पर्धेतील ज्यूरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित, कौशल्य विकास मंत्रालयाने दिलेल्या ४ समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केले. विजेत्या संघां...

December 13, 2024 7:28 PM December 13, 2024 7:28 PM

views 5

रत्नागिरीत वायुगळतीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना

रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं झालेल्या वायुगळतीप्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यावर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. त्यांनी आज रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची भेट घेतली.

December 13, 2024 7:42 PM December 13, 2024 7:42 PM

views 11

बीड जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी सकल मराठा समाजानं आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. बीड शहरासह जिल्ह्यात इतरत्रही व्यापारी-दुकानदारांसह नागरिकांनी या बंदला प्रतिसाद दिला. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला असू...

December 13, 2024 7:42 PM December 13, 2024 7:42 PM

views 3

साखर कामगारांचा नियोजित संप २ महिन्यांसाठी स्थगित

वेतनवाढी सह अन्य मागण्यांसाठी राज्यातील दीड लाख साखर कामगारांनी नियोजित संप दोन महिन्यांसाठी स्थगित केला आहे. या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र राज्य सरकारने वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना केली. त्यामुळं हा संप दोन महिन्यांसाठी स्थगित केल्याचं साखर कामग...

December 13, 2024 7:06 PM December 13, 2024 7:06 PM

views 17

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. यावेळी प्रधानमंत्र्यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांवर दिली.

December 13, 2024 7:53 PM December 13, 2024 7:53 PM

views 27

महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र २०२८ ते २०३० पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट पार केलं आ...

December 13, 2024 7:20 PM December 13, 2024 7:20 PM

views 3

परभणी प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून गंभीर दखल

परभणीतल्या हिंसाचार प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश आयोगानं परभणीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना दिले आहेत.   या प्रकरणी पोलिसांनी एकूण ८ गुन्ह्यांची नोंद केली असून, ...