प्रादेशिक बातम्या

December 26, 2024 10:03 AM December 26, 2024 10:03 AM

views 10

लातूरमध्ये खून प्रकरणी डॉ. प्रमोद घुगेला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा प्रमुख डॉ.प्रमोद घुगे याला न्यायालयानं ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आपल्याच रुग्णालयातला कर्मचारी बाळू डोंगरे याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ घुगे याला उत्तराखंडातून अटक करून काल न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणातल्या अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

December 26, 2024 12:49 PM December 26, 2024 12:49 PM

views 9

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा शुभारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या २७ डिसेंबरला स्वामित्व योजनेचा प्रारंभ होत आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यांत डिजिटल पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम होईल. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं ही माहिती दिली. पन्नास लाखा...

December 26, 2024 3:17 PM December 26, 2024 3:17 PM

views 6

जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी...

December 25, 2024 5:43 PM December 25, 2024 5:43 PM

views 7

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा समारोप

सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. त्या निमित्तानं काल सोलापूरमधल्या हरिभाऊ देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यामध्ये अभाविप चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं...

December 25, 2024 3:30 PM December 25, 2024 3:30 PM

views 11

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

१९ व्या 'मोहम्मद रफी' पुरस्काराचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा 'मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' मरणोत्तर देण्यात आला. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प...

December 25, 2024 3:29 PM December 25, 2024 3:29 PM

views 10

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार

नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे 80 प्रकल्प पूर्ण केले याशिवाय पश्चिम महा...

December 25, 2024 9:30 AM December 25, 2024 9:30 AM

views 8

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

येत्या 24 तासात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक सल्ला आणि हवामानाच्या अं...

December 25, 2024 9:22 AM December 25, 2024 9:22 AM

views 13

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा...

December 25, 2024 1:53 PM December 25, 2024 1:53 PM

views 19

नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह

देशभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गोव्यामध्ये धार्मिक वातावरणात नागरिक उत्सवाचा आनंद घेत आहेत. दोडोल, केक, बेबिंका यांसारख्या गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांनी दुकानं फुलून गेली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ना...

December 24, 2024 6:57 PM December 24, 2024 6:57 PM

views 2

जालन्यात जाफ्राबाद-चिखली मार्गावर प्रवासी बसला अपघात, १५ जखमी

जालनातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर आज सकाळी प्रवासी वाहतूक करणारी एक बस वीस फुट खड्डयात  कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिखली आगाराची ही बस कोळेगाव घाट चढत असताना अचानक स्टेअरिंगचा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.