प्रादेशिक बातम्या

December 31, 2024 7:52 PM December 31, 2024 7:52 PM

views 6

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे जबाबदार असतील, ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्या सर्वांवर कडक कारवाई करू, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात गुंडांचं, हिंसेचं, खंडणीखोरांचं राज्य चालू देणार नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे...

December 31, 2024 7:41 PM December 31, 2024 7:41 PM

views 9

मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे

रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध लादले होते. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हे निर्बंध हटवल्याचं रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

December 31, 2024 7:36 PM December 31, 2024 7:36 PM

views 3

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथे आज सदिच्छा भेट घेतली. कोराडी इथल्या जगदंबेची काष्ठशिल्पातली मूर्ती यावेळी बावनकुळे यांनी मोदी यांना भेट दिली आणि आई जगदंबेच्या दर्शनाला येण्याची विनंतीही केली. 

December 31, 2024 7:30 PM December 31, 2024 7:30 PM

views 1

सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ (NCF) मार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार असल्याची माहिती रावल यांनी दिली.

December 31, 2024 8:11 PM December 31, 2024 8:11 PM

views 5

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण

२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.   नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातले नागरिक सज्ज झाले आहेत. नाताळ आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटक विविध पर्यटन स्थळांवर दाखल झालेत. नववर्षानिमित्त ठिक...

December 31, 2024 7:17 PM December 31, 2024 7:17 PM

views 2

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात पर्यटक दाखल

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे समुद्रकिनारे  आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.  गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम तेजीत आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातल्या शिरोडा, वेंगुर्ले,...

December 31, 2024 8:12 PM December 31, 2024 8:12 PM

views 11

सहाय्य योजनांचं अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचं अनुदान DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा  मुख्यमंत...

December 31, 2024 8:12 PM December 31, 2024 8:12 PM

views 60

राज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक

दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर महिन्यात राज्यभरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातल्या १९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार दिवसांत विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबादमधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  ९ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अट...

December 31, 2024 4:06 PM December 31, 2024 4:06 PM

views 7

मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बांधकामं थांबवण्याचे पालिकेचे आदेश

मुंबईतल्या वायू प्रदुषणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भायखळा आणि बोरीवली पूर्व भागातली सर्व बांधकामं थांबवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईत काल ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. भायखळा आणि बोरीवली पूर्व इथं बांधकांम कंत्राटदार आणि विकासक प्रदूषणासंदर्भातले नियम पा...

December 31, 2024 3:37 PM December 31, 2024 3:37 PM

views 4

कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन सज्ज

कोरेगांव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि ७५० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांन...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.