प्रादेशिक बातम्या

January 6, 2025 4:06 PM January 6, 2025 4:06 PM

views 3

पालघर जिल्ह्यात डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात डहाणू, दापचरी परिसरात आज पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

January 6, 2025 4:06 PM January 6, 2025 4:06 PM

views 3

नांदेडमधे माळेगाव यात्रेत शासकीय कार्यक्रमांची सांगता

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत शासकीय कार्यक्रमांची सांगता झाली आहे. कुस्त्यांच्या दंगलीचं उद्घाटन काल नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. इतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड सह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली याजिल्ह्यातू...

January 6, 2025 3:55 PM January 6, 2025 3:55 PM

views 11

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निःपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवि...

January 6, 2025 3:41 PM January 6, 2025 3:41 PM

views 106

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्यात विविध ठिकाणी महारेलनं उभारलेल्या ७ उड्डाणपुलांचं नागपुरातून लोकार्पण करताना ते बोलत होते.   एका बाजूला केंद्र शासन...

January 6, 2025 3:46 PM January 6, 2025 3:46 PM

views 22

आज मराठी पत्रकारिता दिन…

मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरु केलं तो ६ जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र...

January 6, 2025 9:30 AM January 6, 2025 9:30 AM

views 13

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रण विभागानं तस्करी होत असलेले अमली पदार्थ जप्त केले. यात 74 हजार कॅप्सूल तसंच अडीच लाख बनावट सिगारेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी होत असल्याची माहिती नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्...

January 6, 2025 10:00 AM January 6, 2025 10:00 AM

views 13

बीड हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

January 5, 2025 8:17 PM January 5, 2025 8:17 PM

views 8

विश्वासार्हता हेच सहकारी संस्थांचे भांडवल – नितीन गडकरी

महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते. सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आण...

January 5, 2025 7:44 PM January 5, 2025 7:44 PM

views 14

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष...

January 5, 2025 7:37 PM January 5, 2025 7:37 PM

views 5

बीडमधे स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान

बीड जिल्ह्यात, स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत ४ लाख ७२ हजारहून अधिक कुटुंबांमध्ये स्पर्धा होणार असून येत्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे.    बीड जिल्ह्यात १३५ गावामध्ये घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार काम सुरू आहे. यासंबंधी ग्रामस्थांमध्ये अधिक जनजागृत...