प्रादेशिक बातम्या

January 6, 2025 8:31 PM January 6, 2025 8:31 PM

views 4

कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. त्यात, प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे.    उत्कृष्ट पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी, मुद्र...

January 6, 2025 8:27 PM January 6, 2025 8:27 PM

views 12

भाजपा-महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही-चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसल्याचं महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात गेले होते, त्यामुळे पालकमंत्रि...

January 6, 2025 8:25 PM January 6, 2025 8:25 PM

views 14

भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज-प्रताप सरनाईक

रस्ते वाहतूक, रेल्वे, तसंच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरचा वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे. मुंबई महानगर क्षेत्रात `‘केबल कार’ प्र...

January 6, 2025 8:23 PM January 6, 2025 8:23 PM

views 22

जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समिती बैठक

कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन लाभक्षेत्रातल्या जमिनीला देण्याचा निर्णय आज अहिल्यानगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असं सूक्ष्म नियोजन पाटबंधारे ...

January 6, 2025 8:21 PM January 6, 2025 8:21 PM

views 5

शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करण्यासाठी बैठक

किमान आधारभूत किंमतींपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी कृषी पणन मंडळाला दिल्या आहेत. शेतमालाची एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी झाली तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केलं. शेतमालाच्...

January 6, 2025 8:04 PM January 6, 2025 8:04 PM

views 7

रस्ता सुरक्षेत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी करावी- नितेश राणे

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी केली तरच रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होईल असं, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश  राणे यांनी म्हटलं आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस  इथं  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय  कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान २०...

January 6, 2025 8:02 PM January 6, 2025 8:02 PM

views 9

मनोज जरांगे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून जरांगे यांच्या विरोधात बीड, अंबाजोगाई, किल्ले धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्या निषेधात केज पोलीस ठाण्यात ओबीसी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन के...

January 6, 2025 7:51 PM January 6, 2025 7:51 PM

views 10

भायखळा-बोरिवलीत बांधकामावरचे निर्बंध शिथील-BMC

मुंबई महानगरातल्या हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारल्यामुळे भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामावर लावलेली सरसकट बंदी हटवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली.   प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी हे निर्बंध लादायचा निर्णय महानगरपालिकेनं ...

January 6, 2025 7:49 PM January 6, 2025 7:49 PM

views 8

विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं- नितीन गडकरी

स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही रस्ते सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत 'रस्ते सुरक्षा अभियान २०२५'च्या 'सुरक्षा रिलोडेड' कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. दुदैवानं गेल्या ...

January 6, 2025 6:26 PM January 6, 2025 6:26 PM

views 11

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रूग्ण नाही

मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी श्व...