प्रादेशिक बातम्या

January 22, 2025 9:58 AM

views 18

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ...

January 22, 2025 9:54 AM

views 27

नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या...

January 22, 2025 9:53 AM

views 12

दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान

राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.

January 22, 2025 9:38 AM

views 12

न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.

January 22, 2025 8:42 AM

views 16

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं सामाजिक कार्य किसन मह...

January 21, 2025 8:21 PM

views 9

देशाची अवकाश अर्थव्यवस्था पुढच्या दशकात ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल-डॉ जितेंद्र सिंह

देशाच्या अवकाश अर्थव्यवस्थेनं आठ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला असून पुढच्या दशकात ती ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या मुलाखतीत बोलत होते.

January 21, 2025 7:36 PM

views 27

बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं.   पण ...

January 21, 2025 7:36 PM

views 36

छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच...

January 21, 2025 7:29 PM

views 6

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पथक दाखल होणार आहे. गुईलेंन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील ६ आणि इतर...

January 21, 2025 7:25 PM

views 18

सैफ अली खान उपचारांनंतर सूखरुप घरी

चाकू हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. १६ जानेवारी रोजी पहाटे सैफ अली खान याच्यावर वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले होते. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्ट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.