प्रादेशिक बातम्या

January 21, 2025 3:01 PM January 21, 2025 3:01 PM

views 10

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

मराठी भाषेतल्या साहित्यनिर्मितीबद्दल राज्य शासनाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी २०२४ या वर्षाकरता अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तकं या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात य...

January 21, 2025 2:56 PM January 21, 2025 2:56 PM

views 15

दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळण्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त ते काल बोलत होते. या संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट य...

January 21, 2025 12:51 PM January 21, 2025 12:51 PM

views 11

जागतिक आर्थिक मंच : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध राज्यांचे आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आज विविध कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तसंच अनेक सामंजस्य करा...

January 21, 2025 8:49 AM January 21, 2025 8:49 AM

views 14

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. दरम्य...

January 21, 2025 8:45 AM January 21, 2025 8:45 AM

views 8

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्...

January 21, 2025 8:44 AM January 21, 2025 8:44 AM

views 19

धाराशिवमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यास...

January 21, 2025 8:34 AM January 21, 2025 8:34 AM

views 14

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महि...

January 20, 2025 8:15 PM January 20, 2025 8:15 PM

views 7

पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार- मंगलप्रभा लोढा

जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र...

January 20, 2025 8:13 PM January 20, 2025 8:13 PM

views 1

अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सबळ पुरावा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्या बोटांचे १९ ठसे सतगुरू शरण इमारतीत पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पायऱ्या, खिडकी  आणि अपार्टमेंटमध्ये बोटांचे ठसे आढळले असून हे आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहेत असं पोलिसांनी सांगि...

January 20, 2025 8:16 PM January 20, 2025 8:16 PM

views 4

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानं विरोधकांची सरकारवर टीका

रायगड आणि नाशिक इथल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आज पालकमंत्री बदलतील, तर उद्या उपमुख्यमंत्री बदलतील. बहुमत मिळूनही महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एकनाथ शिंदे यांची भाजपाला गर...