प्रादेशिक बातम्या

January 22, 2025 9:38 AM January 22, 2025 9:38 AM

views 6

न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.

January 22, 2025 8:42 AM January 22, 2025 8:42 AM

views 6

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं सामाजिक कार्य किसन मह...

January 21, 2025 8:21 PM January 21, 2025 8:21 PM

views 3

देशाची अवकाश अर्थव्यवस्था पुढच्या दशकात ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल-डॉ जितेंद्र सिंह

देशाच्या अवकाश अर्थव्यवस्थेनं आठ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला असून पुढच्या दशकात ती ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या मुलाखतीत बोलत होते.

January 21, 2025 7:36 PM January 21, 2025 7:36 PM

views 12

बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं.   पण ...

January 21, 2025 7:36 PM January 21, 2025 7:36 PM

views 23

छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच...

January 21, 2025 7:29 PM January 21, 2025 7:29 PM

views 3

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण

पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पथक दाखल होणार आहे. गुईलेंन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील ६ आणि इतर...

January 21, 2025 7:25 PM January 21, 2025 7:25 PM

views 11

सैफ अली खान उपचारांनंतर सूखरुप घरी

चाकू हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याला उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. १६ जानेवारी रोजी पहाटे सैफ अली खान याच्यावर वांद्रे इथल्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले होते. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्ट...

January 21, 2025 7:22 PM January 21, 2025 7:22 PM

views 3

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

पुणे शहर परिसरात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या  घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.   पुणे स्टेशन आणि महर्षि परिसरातून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महर्षीनगर भागात ...

January 21, 2025 7:16 PM January 21, 2025 7:16 PM

views 2

ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आळंदीत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ कीर्तनकार डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवावर आज आळंदी इथं अंत्यसंस्कार झाले. काल रात्री त्यांचं पुण्यात निधन झालं होतं. ते ८९ वर्षांचे होते. साखरे महाराज यांचा शिष्य परिवार देशात, तसंच परदेशातही आहे. राज्य सरकारनं २०१८ या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं ...

January 21, 2025 3:19 PM January 21, 2025 3:19 PM

views 10

बीड : जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं बीड जिल्ह्यातील १३ सरपंच आणि ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव जागांवरून निवडून आलेल्या सदस्यांना बारा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असतं. पण बीड जिल...