प्रादेशिक बातम्या

February 20, 2025 7:16 PM

views 15

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली आहे. मुंबई विद्यापिठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोल...

February 20, 2025 8:49 PM

views 62

काजूला हमीभाव मिळण्यासाठी रत्नागिरीत लाक्षणिक उपोषण

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या काजु उत्पादक जिल्ह्यांमध्ये काजूला हमीभाव मिळावा या मागणीसाठी रत्नागिरी तालुक्यात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे.   गोळप इथले शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करत आहेत. गावठी काजू बियांना १६० रुपये, तर वेंगु...

February 20, 2025 3:48 PM

views 26

नागपूर शहरात भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा

नागपूर शहरातल्या लक्षवेध मैदानावर २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान अखिल भारतीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.   या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या मैदानाचं भूमिपूजन माजी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते आज झालं. नागपूर महानगरपालिकेनं ही स्पर्धा आयोजित केली आहे.  

February 20, 2025 3:29 PM

views 87

लेखिका ललिता गादगे यांना काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार जाहीर

नांदेड जिल्ह्यातल्या गोरठे इथल्या वरद प्रतिष्ठानच्यावतीनं दिला जाणारा यावर्षीचा काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार लेखिका ललिता गादगे यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पाच हजार रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गादगे यांची आजवर...

February 20, 2025 9:03 PM

views 30

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात परिचारिकांचं कामबंद आंदोलन

छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पदोन्नतीसह, परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयात परिसेविका पद पुनर्जीवित करणं, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणं, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या स...

February 20, 2025 3:25 PM

views 22

धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं कामबंद आंदोलन

रखडलेली बिलं अदा करावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं आज कामबंद आंदोलन केलं. ठेकेदारांची दोन ते तीन वर्षांची कोट्यवधींची बिलं रखडली आहेत, ८० ते १०० टक्के काम करूनही शासनाकडून केवळ ८ ते १० टक्के निधी मिळतो असं संघटनेनं म्हटलं आहे. मागणी मान्य झाली नाही तर सर्व कामं बंद करू, असा इशा...

February 20, 2025 9:04 PM

views 15

समता सैनिक दलाचं नागपूरच्या संविधान चौकात निदर्शन

अर्थसंकल्पामधे अनुसूचित जाती, जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा द्यावा, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करावी आदी मागण्यांसाठी समता सैनिक दलानं नागपूरच्या संविधान चौकात आज निदर्शनं केली. रमाई घरकुल योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवा, सुशिक्षित बेरोजगार...

February 20, 2025 1:42 PM

views 17

९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात

९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून तीन दिवस पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भू-अर्थशास्त्राबाबत विविध मुद्यांवर विचारविनिमय होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं या कार्यक्रम होणा...

February 19, 2025 8:57 PM

views 22

माझ्या पसंतीचे सिडको घर लॉटरीची आज ऑनलाईन सोडत

‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण इथं काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी २१ हजार ३९९ नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं.

February 19, 2025 8:46 PM

views 9

राज्यातल्या आरोग्य यंत्रणेत २ हजारांहून अधिक पदांच्या निर्मितीला सरकारची मान्यता

राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करायला मान्यता दिली आहे.  त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण २ हजार ७० पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. टप्याटप्यानं सर्व रिक्त जागा भरण्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.