प्रादेशिक बातम्या

February 6, 2025 9:50 AM February 6, 2025 9:50 AM

views 6

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते.

February 5, 2025 8:18 PM February 5, 2025 8:18 PM

views 14

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांन...

February 5, 2025 8:10 PM February 5, 2025 8:10 PM

views 2

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णप...

February 5, 2025 7:36 PM February 5, 2025 7:36 PM

views 15

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएस, अर्थात गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अक्कलकुवा तालुक्यातली हा मुलगी 25 जानेवारीपासून उपचारासाठी दाखल असून तिच्यात जीबीएसची लक्षणं दिसून येत होती. सध्या ती व्हॅटीलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर...

February 5, 2025 7:33 PM February 5, 2025 7:33 PM

views 15

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ

गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं १३ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं ...

February 5, 2025 7:32 PM February 5, 2025 7:32 PM

views 15

देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी गडचिरोली हा जिल्हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या, देशातल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील कृतीदलानं सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुर...

February 5, 2025 7:17 PM February 5, 2025 7:17 PM

views 12

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्...

February 5, 2025 7:15 PM February 5, 2025 7:15 PM

views 2

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

कृषीप्रधान संस्कृती आणि सर्वाधिक लोकसंख्यांक लोकशाही जपण्याची सामूहिक जबाबदारी सर्वच क्षेत्रांची असली तरी सर्वाधिक टक्का असणाऱ्या कृषी क्षेत्रावर आणि पर्यायानं कृषी पदवीधरांवर ती जास्त आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३...

February 5, 2025 7:11 PM February 5, 2025 7:11 PM

views 22

येत्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन

पुढच्या पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरं उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आज ठाण्यात कोकण विभागातली म्हाडाची लॉटरी काढताना बोलत होते. लोकांचा विश्वास म्हाडावर आहे, त्यामुळे लॉटरी निघाल्यावर घरांचा ताबा लवकर द्या, चांगल्या दर्जाचं घर द्या, घरांची गुणवत्...

February 5, 2025 7:10 PM February 5, 2025 7:10 PM

views 5

राज्य सरकार यावर्षी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन आयोजित करणार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित मुंबई ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज झालं, यावेळी ते बोलत होते. मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.