प्रादेशिक बातम्या

February 16, 2025 3:06 PM February 16, 2025 3:06 PM

views 4

सोलापुरात झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहराजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या एका वाहनानं, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.   दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून वाहन...

February 16, 2025 3:43 PM February 16, 2025 3:43 PM

views 7

मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबईतल्या मस्जिद बंदर भागात आज सकाळी एका इमारतीला लागलेल्या आगीत २ महिलांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले. धुरामुळे गुदमरून जखमी झालेल्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे. पोलीस आगीच्या कारणांचा तपास करत आहेत.

February 16, 2025 3:43 PM February 16, 2025 3:43 PM

views 2

कर्नाळा पक्षी अभयारण्यात विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, एकाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यामधल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काल मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत कोपरखैरणे इथल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर माटुंग्याच्या व्ही जे टी आय महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर पनवेलमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार ...

February 16, 2025 8:25 AM February 16, 2025 8:25 AM

views 14

पुण्यात शेतकऱ्यांना ओळखपत्राचं वाटप

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ओळख क्रमांक जुन्नर तालुक्यात दिले आहेत. पुणे शहरात शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं केवळ २१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले . शेतकऱ्यांकडे जमीन, कर्ज, मिळणार्या योजनांचा लाभ आदी माहिती असणारं एक ओ...

February 16, 2025 8:21 AM February 16, 2025 8:21 AM

views 16

पुण्यात जीबीएसचे २०८ रुग्ण

पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस चे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो-बॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे.   या रुग्णांपैकी 42 रुग्ण पुणे महापा...

February 16, 2025 8:43 AM February 16, 2025 8:43 AM

views 11

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलीस दलानं करावं – मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलाकरीता नवीन कार्यालयं, वाहनं, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातील पोलीस दल करे...

February 15, 2025 8:33 PM February 15, 2025 8:33 PM

views 7

मुंबई विमानतळावर सुमारे सव्वा सात किलो सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचं सुमारे सव्वा सात किलो सोनं काल रात्री जप्त केलं. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत  सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना याप्रकरणी अटक केली आहे. 

February 15, 2025 8:15 PM February 15, 2025 8:15 PM

views 9

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती

गोर-बंजारा समाजाचं आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं. श्री सेवालाल महाराज यांचे विचार न्यायप्रिय, सौहार्दपूर्ण आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाला सदैव मार्गदर्शन करत राहतील, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.  &nbs...

February 15, 2025 8:41 PM February 15, 2025 8:41 PM

views 11

कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम करण्याचा निर्धार-एकनाथ शिंदे

‘खरी शिवसेना कोणती ते राज्यातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं,' असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं. विधानसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित आभार सभेत ते बोलत होते.   ‘कोकणाचा कॅलिफोर्निया नाही, तर कॅ...

February 15, 2025 7:58 PM February 15, 2025 7:58 PM

views 4

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

४४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात उभारलेल्या विलासराव देशमुख साहित्य नगरीतून निघालेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. मसिआचे अधक्ष चेतन राऊत यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्र...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.