प्रादेशिक बातम्या

March 22, 2025 2:47 PM

views 29

नागपूर हे शांततेचं प्रतीक – माणिकराव ठाकरे

देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे. हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये, असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं.   काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर ...

March 22, 2025 1:05 PM

views 24

‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली

राज्यात पायाभूत सुविधांचं काम विलक्षण वेगानं सुरु असून ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल, फेज -१’ या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना लक्षणीय चालना मिळाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.   पायाभूत सुविधांसाठी राज्यात ४१ हजार ७३० कोटी रुपयांची गुंतवणू...

March 21, 2025 8:13 PM

views 42

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर

राज्याचा २०२५-२६ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आज मंजूर केला. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या विभागवार मागण्यांवर सभागृहात चर्चा झाली आणि त्या मंजूर झाल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरीसाठी महाराष्ट्र विनियोजन विधेयक सादर केलं आणि ते सभागृहानं एकमतानं...

March 21, 2025 8:11 PM

views 8

देवगड हापुस आंब्यावर लागणार आयडी कोड !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड हापुस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी या वर्षीपासून या आंब्यावर यूनिक आयडी कोड लावण्यात येणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे.   या नवीन पद्धतीनुसार, अस्सल हापुस आंब्यावर हा स्टिकर लावणं बंधनकारक होणार आहे....

March 21, 2025 7:48 PM

views 10

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५५७ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज ५५७ अंकांची वाढ झाली, आणि तो ७६ हजार ९०६ अंकांवर बंद झाला.   राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६० अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ३५० अंकांवर बंद झाला.

March 21, 2025 7:47 PM

views 28

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेली महिला अटक

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खंडणीच्या आरोपावरुन अटक केली आहे. ३ कोटी रुपये दिले नाहीत तर जयकुमार गोरे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी तिने दिली होती.   सदर महिला तिच्या वकीलामार्फत 2 टप्प्य...

March 21, 2025 7:45 PM

views 27

आगामी काळात महसुली विभागाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील- महसूल मंत्री

राज्यभरातल्या महसुलाशी संबंधित सुनावण्या डिजिटल स्वरूपात करण्यासाठीच्या प्रत्यय या प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.   ‘प्रत्यय’, अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे या प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन अर्ज इत्यादी विषय ऑनल...

March 21, 2025 7:39 PM

views 13

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांचं नेहमीच सहकार्य- मुख्यमंत्री

राज्य सरकारचं काम बँकांसाठी आश्वासक ठरत असून पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांनी नेहमीच सहकार्य केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं.   महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची आढावा बैठक फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सर्व बँकांकडून या महामं...

March 21, 2025 7:23 PM

views 12

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठीची जबाबदारी आता पर्यटन विभागाकडे

आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी कार्यान्वयन आणि निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला.   स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ञांसह इतर जाणकारांची समिती स्थापन केली जाणार आहे. या प्रकल्पा...

March 21, 2025 7:18 PM

views 28

नंदुरबार जिल्ह्यात आमला वनक्षेत्रात लागलेल्या आगीत १० ते १२ हेक्टर जंगल नष्ट

नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात आमला वनक्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मधूनच वणवे पेटल्यामुळे आग भडकत आहे. या आगीत आत्तापर्यंत दहा ते बारा हेक्टर जंगल नष्ट झाल्याचं वनविभागानं सांगितलं. वनसंपत्तीचं नुकसान झालं असलं तरी अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.