प्रादेशिक बातम्या

March 5, 2025 3:47 PM March 5, 2025 3:47 PM

views 20

प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.   राज्य सरकारच्या या...

March 5, 2025 9:47 AM March 5, 2025 9:47 AM

views 12

मध्य रेल्वेचे ११ कर्मचारी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना यांच्या हस्ते काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   कल्याण स्थानकात, सिग्नल आणि दूरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्य...

March 4, 2025 8:39 PM March 4, 2025 8:39 PM

views 10

विधीमंडळात दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचं कामकाज सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या गदारोळानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी क...

March 4, 2025 7:27 PM March 4, 2025 7:27 PM

views 216

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारला

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन या...

March 4, 2025 7:42 PM March 4, 2025 7:42 PM

views 11

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक होईल, अशी आशा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांन...

March 4, 2025 6:30 PM March 4, 2025 6:30 PM

views 4

लाडकी बहिण योजनेचा दोन्ही महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा होईल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ को...

March 4, 2025 7:33 PM March 4, 2025 7:33 PM

views 13

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही, मुख्यमंत्र्...

March 4, 2025 3:01 PM March 4, 2025 3:01 PM

views 8

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर पती-पत्नी दोघांचीही नावं लागणार

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर यापुढे पती-पत्नी दोघांच्या  नावाची नोंद करण्याचा  निर्णय  घेतला आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी राहत्या घराची नोंद पती-पत्नी दोघांच्या नावे असणं आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचं प्राध...

March 4, 2025 2:57 PM March 4, 2025 2:57 PM

views 31

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या...

March 4, 2025 1:37 PM March 4, 2025 1:37 PM

views 15

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग...