प्रादेशिक बातम्या

March 6, 2025 3:21 PM March 6, 2025 3:21 PM

views 20

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक

महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत  एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका, नगरपंचायत...

March 5, 2025 8:35 PM March 5, 2025 8:35 PM

views 20

Stamp Duty: प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.   राज्य सरकारच्या या निर्णयामुळे...

March 5, 2025 8:00 PM March 5, 2025 8:00 PM

views 11

गडचिरोली पोलीस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलिस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. एका पोलिस शिपाई तसंच भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत त्यांचा सहभाग होता.

March 5, 2025 7:54 PM March 5, 2025 7:54 PM

views 11

छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालेल्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची घोषणा

छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.   रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचा...

March 5, 2025 7:25 PM March 5, 2025 7:25 PM

views 15

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं आज अविश्वास प्रस्ताव सादर केला. सभापती राम शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला. शिवसेना पक्ष फुटीपूर्वी त्या उपसभापती झाल्या होत्या. त्यानंतर काही काळ त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. नंतर त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्...

March 5, 2025 3:15 PM March 5, 2025 3:15 PM

views 3

भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. मात्र संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या स...

March 5, 2025 3:11 PM March 5, 2025 3:11 PM

views 4

कैलास बोऱ्हाडे युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन

जालना जिल्ह्यात कैलास बोऱ्हाडे या युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलं. याप्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच पालकमंत्री तिथे भेट देतील, असं शिंदे म्हणाले.   राज्यात...

March 5, 2025 3:39 PM March 5, 2025 3:39 PM

भंडाऱ्यात भुमिगत खाणीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात चिखला इथे भूमिगत खाणीत अपघात होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला खाणीतल्या स्लॅब कोसळून त्याखाली तीन कामगार दबले गेले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला. जखमी कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 9

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधान...

March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 112

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना ठोठावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्थगिती दिली. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार दूर झाली आहे. कोकाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या तिन्ही हस्तक्षेप याचिकाही न्यायाल...