प्रादेशिक बातम्या

March 24, 2025 6:50 PM

views 22

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘जागतिक क्षयरोग विरोधी दिन’ साजरा

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली. त्या व्यतिरिक्त क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रकं तसंच  सन्मानचिन्ह  प्रदान कर...

March 24, 2025 7:44 PM

views 22

कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी, विरोधकांची टीका

विधानसभेत आज विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.    जमीनग्रहण झाले नसताना, इतर विभागांच्या परवानग्या आलेल्या नसतानाही बेकायदेशीररीत्या अनेक नवीन मार्गांच्या कामाचे कार्यादेश घाईनं देण्यामागे नेमके क...

March 24, 2025 7:43 PM

views 24

मुंबईत जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईत जुन्या झालेल्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून या इमारतींचा पुनर्विकास केला जाईल, कुणालाही बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.    या इमारतींच्या मालकांना वाटलं म्हणून ती इमारत पाडून त्यावर टॉवर बांधता य...

March 24, 2025 6:29 PM

views 27

महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयकास मंजूरी

महामार्गांचं संरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीच्या एका वर्षाचा  कालावधी वाढवून दोन वर्षांचा करण्यासाठीचं महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. खरेदी विक्रीचे व्यवहार करताना मुद्रांक शुल्क भरल्यानंतर नोंदणी करताना भरावं लागणारं नोंदणी शु...

March 24, 2025 6:25 PM

views 95

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयकाय मंजूरी

कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. कोयना प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या विधेयकात आहे. या सुधारणांमुळे कोयना प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन आणि विजनिर्मितीचं ...

March 24, 2025 3:46 PM

views 34

WAVES 2025: नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा व्हॅम स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेजमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अनेक प्रतिभावान ॲनिमेटर आणि आशय निर्माते ...

March 24, 2025 3:41 PM

views 39

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.   विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. या करता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वडेट्टी...

March 24, 2025 3:38 PM

views 26

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे सरकारनं लक्ष द...

March 24, 2025 3:27 PM

views 7

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर कारवाई

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती. आज सकाळी पालिकेने खानच्या घरावर कारवाई केली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा...

March 24, 2025 3:04 PM

views 23

कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये-अजित पवार

औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही. तसंच कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये, असं त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.