प्रादेशिक बातम्या

November 21, 2025 5:14 PM November 21, 2025 5:14 PM

views 15

मुंबईत CSMI विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या आठवड्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये अंमली पदार्थ तसंच सोन्याची तस्करी पकडली आहे. एका कारवाईत २५ किलो ३१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारातली किंमत २५ कोटी इतकी आहे. या कारवाईत ७ जणांना अटक करण्यात आल...

November 21, 2025 6:52 PM November 21, 2025 6:52 PM

views 67

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहु...

November 20, 2025 8:08 PM November 20, 2025 8:08 PM

views 19

उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त

ईडीच्या विशेष कृती दलानं उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त केल्या आहेत. नवी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी आणि मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये या इमारती आहेत. याशिवाय पुणे, चेन्नई, भुवनेश्वरमधल्याही काही इमारती आणि मोकळ्या जागा ईडीनं जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तांची एकत्रि...

November 20, 2025 6:49 PM November 20, 2025 6:49 PM

views 24

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचं  उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरा...

November 20, 2025 3:04 PM November 20, 2025 3:04 PM

views 37

पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

पुणे - माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहे. परवा रात्री ही घटना घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली.   चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्...

November 20, 2025 2:57 PM November 20, 2025 2:57 PM

views 18

विद्यार्थ्यांसाठी भारतीय टपाल सेवेक विशेष स्टुडंट मेल योजना सुरू

विद्यार्थांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्रं पाठवण्यासाठी आता भारतीय टपाल सेवेनं विशेष स्टुडंट मेल योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना टपाल सेवेच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळणार आहे.   त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि...

November 19, 2025 3:49 PM November 19, 2025 3:49 PM

views 22

आंतरराष्ट्रीय विमानतळा उद्या 6 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची विमानसेवा उद्या सहा तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टीच्या देखभालीची आणि दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत.    या कामांच्या पार्श्वभूमीवर काह...

November 19, 2025 3:22 PM November 19, 2025 3:22 PM

views 18

गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते.   ब्रिटिशांनी तयार ...

November 19, 2025 9:11 AM November 19, 2025 9:11 AM

views 49

वन्य प्राण्यांचे हल्ले आणि धान पीकात पाणी साचण्यालाही प्रधानमंत्री पीकविमा योजनेचं संरक्षण मिळणार

वन्य प्राण्यांचे हल्ले आणि भाताच्या शेतीत पाणी साठल्यानं होणारं नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलं जाईल. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं होणारं पीक नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवं अतिरिक्त कवच म्हणून ओळखलं जाईल, तर भातशेतीचं पाण्यामुळं होणारं नुकसान स्थानिक आपत्...

November 18, 2025 8:13 PM November 18, 2025 8:13 PM

views 35

राष्ट्रीय जल पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  राज्य सरकारन...