प्रादेशिक बातम्या

March 31, 2025 8:43 PM

views 14

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर-हर्षवर्धन सपकाळ

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बीडमध्ये गुंडाराज आले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

March 31, 2025 8:41 PM

views 25

आकाशवाणी मुंबई प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त

आकाशवाणी मुंबई, प्रदेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कुवळेकर आज सेवानिवृत्त झाल्या. भारतीय माहिती सेवेतल्या ३४ वर्षात त्यांनी फिल्म प्रभाग, दूरदर्शनचा वृत्त विभाग, आणि आकाशवाणी अशा विविध ठिकाणी काम केलं. 

March 31, 2025 8:10 PM

views 35

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण-IMD

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमार्गे एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झ...

March 31, 2025 7:54 PM

views 19

म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचं उद्दीष्ट

'म्हाडा', अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणानं वर्ष २०२५-२०२६ च्या अर्थसंकल्पात १९ हजार ४९७ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९ हजार २०२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सुमारे १५ हजार ९५७ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून, वर्ष २०२४-२५...

March 31, 2025 7:45 PM

views 31

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं-मुख्यमंत्री

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, असं आश्वासनही त्यानी दिलं. ते आज भारती कृष्ण विद्या विहार शाळेत शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्य...

March 31, 2025 6:13 PM

views 34

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, Animation, VFX, Gaming, and Comics यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्या...

March 31, 2025 3:45 PM

views 40

अपघातग्रस्तांना वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत – मुंबई उच्च न्यायालय

मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईतून वैद्यकीय विम्या अंतर्गत मिळालेले पैसे वजा करता येणार नाहीत, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. विमा कंपनीसोबत केलेल्या करारानुसार त्या व्यक्तीला वैद्यकीय विम्या अंतर्गत रक्कम मिळते असं न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती ए एस चांदुरकर, म...

March 31, 2025 3:12 PM

views 24

मशिदीत स्फोट घडवणाऱ्या आरोपींवर UAPA कायदा लागू करण्याची जलील यांची मागणी

बीड जिल्ह्यात मशिदीत स्फोट घडवल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपीवर यूएपीए कायदा लागू करावा, अशी मागणी माजी खासदार इम्तियाज़ जलील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथे रमजान ईदच्या नमाजानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काल पहाटे गेवराई तालुक्यातल्या अर्ध मसला गावात हा स्फोट झाला.  पोलिसांनी याप्रकरणी दो...

March 31, 2025 2:41 PM

views 14

अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सर्व विभागांनी राज्य मंत्रिमंडळासमोर नवा प्रस्ताव ठेवताना खर्चात अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. नवीन प्रस्तावात खर्चात झालेली वाढ यामुळे स्पष्टपणे लक्षात येईल, तसंच त्...

March 31, 2025 9:08 PM

views 22

औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुगल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. कुणाला आवडो की न आवडो औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, असं फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.