प्रादेशिक बातम्या

April 1, 2025 9:46 AM

views 27

बीड : प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या अर्धमसला इथं प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणल्याप्रकरणी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना विशेष न्यायालयानं ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथक आता या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे.

April 1, 2025 9:41 AM

views 32

राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा – हवामान विभाग

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

April 1, 2025 9:38 AM

views 23

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नाईट लॅंडींगला सुरुवात

शिर्डी इथल्या श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या अर्थात नाईट लॅंडींग सेवेचा प्रारंभ गुढी पाडाव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. इंडिगो कंपनीच्या विमानानं यावेळी यशस्वी लँडिंग केलं. कंपनीचे अधिकारी आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

April 1, 2025 9:33 AM

views 13

रमजान ईदचा सण राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा

ईद ऊल फित्र अर्थात रमजान ईद काल देशभर उत्साहात साजरी करण्यात आली. पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त काल ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा आनंद साजरा केला. राज्यात मुंबई पुण्यासह सर्वत्...

April 1, 2025 9:32 AM

views 16

अमळनेरमध्ये अहिराणी साहित्य संमेलनाला मिळाला रसिकांचा मोठा प्रतिसाद

बोली मणि अहिराणी; जसं दही मानं लोणी; हे बोधवाक्य घेऊन, अमळनेरमध्ये गेले दोन दिवस अहिराणी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं. अहिराणी शब्दकोश निर्माण करणारे डॉक्टर रमेश सूर्यवंशी या संमेलनाचे अध्यक्ष होते. अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीमध्ये आयोजित या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचं ग्...

April 1, 2025 9:29 AM

views 8

सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू – राम शिंदे

सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. विद्यापीठाच्या ४७२ एकर जमिनीपैकी बरीचशी जमीन वनविभागकडे असल्याने विद्यापीठाचा विकास रखडला असल्याची खंत कु...

April 1, 2025 11:13 AM

views 22

रिझर्व बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याची राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज सांगता

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या सांगता समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य ...

March 31, 2025 9:00 PM

views 32

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात 13 अंशपर्यंत तफावत

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात १३ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमधे सरासरी ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर याच काळात पवईमधे सरास...

March 31, 2025 8:48 PM

views 19

समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा-राज्यपाल

समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे वर्ष  २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे,  असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ व्या  ...

March 31, 2025 8:47 PM

views 28

शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे रोजगारात वाढ होणार-राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सावळीविहीर खुर्द इथल्या शिर्डी औद्योगिक वसाहत इथं डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.