प्रादेशिक बातम्या

April 5, 2025 8:46 AM

views 26

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

April 5, 2025 8:37 AM

views 30

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक आरोग्य दिनी म्हणजे येत्या 7 एप्रिल रोजी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्...

April 5, 2025 8:33 AM

views 26

महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक – चंद्रशेखर बावनकुळे

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाजाबरोबरच नव-तंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्...

April 5, 2025 8:23 AM

views 26

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणू...

April 5, 2025 4:05 PM

views 27

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह, वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी यांसारख्या...

April 4, 2025 8:24 PM

views 19

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. या समितीत उपसचिव, कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यम...

April 4, 2025 8:24 PM

views 16

नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिलांचा मृत्यू

नांदेड तालुक्यात आलेगाव इथं आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं ७ महिलांचा मृत्यू झाला. वसमत तालुक्यातल्या गुंज येथून या मजुरांना भुईमूग निंदणीसाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह ते विहिरीत कोसळले. जवळच काम करत असलेल्या शेतमजुरांनी विहिरीत प...

April 4, 2025 2:46 PM

views 34

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल दिलं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.   त्यावेळी ते बोल...

April 4, 2025 2:43 PM

views 15

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं काल निधन

आकाशवाणीच्या  लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या  सुषमा हिप्पळगावकर यांचं  काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी 2006 मधे  स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.    आका...

April 4, 2025 2:40 PM

views 35

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातल्या संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.