प्रादेशिक बातम्या

March 24, 2025 6:29 PM March 24, 2025 6:29 PM

views 16

महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयकास मंजूरी

महामार्गांचं संरेखन झाल्यानंतर भूसंपादनासाठीच्या एका वर्षाचा  कालावधी वाढवून दोन वर्षांचा करण्यासाठीचं महाराष्ट्र महामार्ग सुधारणा विधेयक, तसंच महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक देखील सभागृहानं मंजूर केलं. खरेदी विक्रीचे व्यवहार करताना मुद्रांक शुल्क भरल्यानंतर नोंदणी करताना भरावं लागणारं नोंदणी शु...

March 24, 2025 6:25 PM March 24, 2025 6:25 PM

views 53

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयकाय मंजूरी

कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. कोयना प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या विधेयकात आहे. या सुधारणांमुळे कोयना प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन आणि विजनिर्मितीचं ...

March 24, 2025 3:46 PM March 24, 2025 3:46 PM

views 16

WAVES 2025: नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा व्हॅम स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेजमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अनेक प्रतिभावान ॲनिमेटर आणि आशय निर्माते ...

March 24, 2025 3:41 PM March 24, 2025 3:41 PM

views 12

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.   विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. या करता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वडेट्टी...

March 24, 2025 3:38 PM March 24, 2025 3:38 PM

views 13

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे सरकारनं लक्ष द...

March 24, 2025 3:27 PM March 24, 2025 3:27 PM

views 2

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर कारवाई

नागपूर हिंसाचार प्रकरणातला प्रमुख आरोपी फहीम खान याचं दुमजली घर पाडण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने खान याच्या घराचा इमारत आराखडा मंजूर नसल्यामुळे त्याचं घर अनधिकृत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली होती. आज सकाळी पालिकेने खानच्या घरावर कारवाई केली. या संपूर्ण परिसरात पोलिसांचा...

March 24, 2025 3:04 PM March 24, 2025 3:04 PM

views 9

कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये-अजित पवार

औरंगजेब कबरीचा मुद्दा काढण्याची गरज नाही. तसंच कोणीही बोलतांना विचार करून बोलले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.  विनाकारण पोलिसांवर किंवा कायदा- सुव्यवस्थेवर ताण येईल असं कोणीही बोलू नये, असं त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं.

March 24, 2025 3:53 PM March 24, 2025 3:53 PM

views 11

कुणाल कामरा विरोधात एफआयआर दाखल, तोडफोड प्रकरणी ११ जणांना अटक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथितरीत्या अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसंच या कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्या स्टुडिओत झालं, त्या स्टुडिओची आणि हा स्टुडिओ असलेल्या हॉटेलची तोडफोड करणाऱ्या ४० शिवसेना कार्यकर्त्यां...

March 24, 2025 2:55 PM March 24, 2025 2:55 PM

views 11

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्रशासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाला. राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमताने मंजूर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत श्री त...

March 24, 2025 1:47 PM March 24, 2025 1:47 PM

views 16

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज जमा करता येतील, असं त्यांनी सांगितले. २६ मार्चला सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.