प्रादेशिक बातम्या

December 29, 2025 8:24 PM

views 338

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्थानिक गणितं लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या बनत आहेत, तसंच अनेक नेते पक्षांतर करत आहेत.   मुंबईसाठी क...

December 29, 2025 8:24 PM

views 14

नववर्ष स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी, MTDC चे रिसॉर्ट फुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी  नागपूर आणि  परिसरातील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे  सर्व रिसॉर्ट १०० टक्के भरले आहेत, तर खासगी हॉटेल्समध्येही सुमारे ८० टक्के बुकिंग झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच-सिल्लारी, नवेगाव-नागझिरा, नवेगावबांध, बोदलकसा, इथल्या  पर्यटक निवासांना मोठी पसंती मिळत आहे...

December 29, 2025 7:13 PM

views 17

Palghar : रेल्वे प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातल्या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आज पालघर इथं एक उच्चस्तरीय बैठक झाली.  या बैठकीत डीएफसीसी अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, विरार–डहाणू रेल्वे चौपदरीकरण...

December 29, 2025 7:08 PM

views 25

रत्नागिरीत नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा  शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे, गुहागर नगर पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या नीता मालप, खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला ,  देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्ष भाजपच्या म...

December 29, 2025 7:05 PM

views 5

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने मुंबईतल्या विविध खासगी आणि सार्वजनिक स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अग्निसुरक्षा उपकरणं सुस्थितीत आणि कार्यान्वित ठेवावीत, दिशादर्शक फलकांचा समावेश, गॅस जोडण्या आणि विद्युत यंत्रणांची तपासणी, ज्वलनशील सा...

December 28, 2025 8:02 PM

views 16

विविध सरकारी योजनांसाठी वाटप केलेला निधी खर्च झाला नसल्याचा आरोप करणारा व्हिडीओ खोटा असल्याचं सरकारचं स्पष्टिकरण

विविध सरकारी योजनांसाठी वाटप केलेला निधी खर्च झाला नसल्याचा आरोप करणारा व्हिडीओ खोटा असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. या व्हिडीओत केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता तपासणी विभागाने म्हटलं आहे. केंद्राने पुरस्कृत केलेल्या योजनांसाठी वाटप केलेल्या निधीचा गेल्या काही वर...

December 28, 2025 7:45 PM

views 13

मध्य प्रदेशात जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सहभागी

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेत...

December 28, 2025 7:36 PM

views 101

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार ...

December 28, 2025 7:15 PM

views 20

  पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी

  मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पालघर जिल्हा परिषदेनं  वाडा खडकोना इथं  एका वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून  उभारण्यात आलेल्या या  बंधाऱ्यामुळं पावसाचं पाणी अडवलं जाणार आहे.   त्यामुळं  भूजल पातळी वाढून स्थानिक शेतीसाठी  पुरेसा जलसाठा निर्माण हो...

December 28, 2025 7:52 PM

views 24

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत वैदेही चौधरीला एकेरी गटाचं विजेतेपद

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत आज वैदेही चौधरी हिनं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात वैदेहीनं जपानच्या मिचिका ओझेकी हिचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत वैदेहीनं वैष्णवी अडकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.