प्रादेशिक बातम्या

June 13, 2025 3:47 PM June 13, 2025 3:47 PM

views 14

परभणी जिल्‍ह्यात पूर्णा इथं आज घेण्यात आलं योग शिबिर

परभणी जिल्‍ह्यात पूर्णा इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज योग शिबिर घेण्यात आलं. शहरातील विद्या प्रसारणी शाळेच्या सभागृहात समर्थ प्रभात योग समिती आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी योग प्रशिक्षकांनी विविध आसनांची प्रात्यक्षिकं सादर केली त्यानंतर...

June 13, 2025 3:44 PM June 13, 2025 3:44 PM

views 2

बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायम...

June 13, 2025 4:14 PM June 13, 2025 4:14 PM

views 15

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट करायची किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत नावांची भर घालणं किंवा नावं वगळणं याबाबत केले गेलेले दावे अतिशयोक्त असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी म्हटलं आहे. भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट करायची किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नसून मतदान क...

June 13, 2025 2:14 PM June 13, 2025 2:14 PM

views 11

देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा

कर्नाटकात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हावेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगिरी इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.   महाराष्ट्रातही पुणे कोल्हापूर सांगलीसह विविध जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. कर्ना...

June 13, 2025 1:48 PM June 13, 2025 1:48 PM

views 12

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातले पाच जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे पवईचे रहिवासी होते. तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते. डोंबिवली इथल्या रोशनी सोनघरे, पनवेलच्या मैथिल...

June 13, 2025 11:48 AM June 13, 2025 11:48 AM

views 7

सिद्धार्थ उद्यानात कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. परवा सायंकाळी वादळी वाऱ्यात या उद्यानाची कमान कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

June 13, 2025 11:40 AM June 13, 2025 11:40 AM

views 6

वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन

वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता राज्य सहकारी बँकेने सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. वाशी इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी ही माहिती दिली. सहकार सुरक्षा या नावा...

June 13, 2025 11:09 AM June 13, 2025 11:09 AM

views 6

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह अ, ब आणि क वर्ग दर्जाच्या महापालिकांना प्रभाग रचना प्रक्रिया ११ जून ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान पूर्ण करायची आहे. राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना २९ ऑगस्ट ते चार सप...

June 13, 2025 11:03 AM June 13, 2025 11:03 AM

views 14

अहिल्यानगर – वारकर्‍यांच्या सुविधांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे १६० स्थानिक पाल...

June 13, 2025 8:54 AM June 13, 2025 8:54 AM

views 10

राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.