राष्ट्रीय

October 12, 2025 8:00 PM October 12, 2025 8:00 PM

views 64

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ ...

October 12, 2025 7:35 PM October 12, 2025 7:35 PM

views 43

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्...

October 12, 2025 6:35 PM October 12, 2025 6:35 PM

views 34

घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट झाल्याचं रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडिया या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवलं आहे. घर खरेदीसाठी या काळात २० अब्ज १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ही उलाढाल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपेक्षा २८ टक्के कमी आहे, असं य...

October 12, 2025 6:10 PM October 12, 2025 6:10 PM

views 24

शेतकऱ्यांच्या पिकाला चांगली किंमत, उत्पादकताही वाढली – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशातले ५२ लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अकराशेपेक्षा जास्त कृषी उत्पादन संघटनांशी जोडलेले असून याद्वारे त्यांच्या पिकाला चांगली किंमत मिळत असून उत्पादकताही वाढली आहे, असं कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या सर्व संघटनांची उलाढाल १५ हजार कोटी रुपयांपेक्ष...

October 12, 2025 4:42 PM October 12, 2025 4:42 PM

views 43

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका यांनी एकमेकांविरुद्ध काम करू नये, सरन्यायाधीशाचं प्रतिपादन

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात, त्यांचं अधिकारक्षेत्र स्वतंत्र असलं, तरी त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम करू नये, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज केलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी आणि ...

October 12, 2025 2:27 PM October 12, 2025 2:27 PM

views 9

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक अटक वॉरंट जारी

जबरदस्तीनं अपहरण करणं आणि मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं केलेल्या आरोपांवरून १५ अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बांग्लादेशच्या लष्करानं दिली. यातील १४ अधिकारी सेवेत कार्यरत असून एक अधिकारी निवृत्तीपूर्व सुट्...

October 12, 2025 2:10 PM October 12, 2025 2:10 PM

views 19

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागालँडमध्ये एकात्मिक अ‍ॅक्वा पार्कची दूरस्थ पद्धतीने पायाभरणी केली.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यात त्झुडिकोड इथं एकात्मिक मत्स्य उद्यान-ॲक्वा पार्कची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केली. नागालँडमधील हे पहिले मत्स्य उद्यान ठरणार असून ते मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध विकास उपक्रमांचं केंद्र असेल. ...

October 12, 2025 2:01 PM October 12, 2025 2:01 PM

views 125

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र

महाराष्ट्रातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. या यादीत रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागावसह, पालघरमधल्या पर्णका, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत ...

October 12, 2025 1:53 PM October 12, 2025 1:53 PM

views 8

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त, ८ जणांना अटक

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघडकीला आणलं आहे. याप्रकरणी १२ जणांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या आठ जणांना अटक केली. या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून अटक केली. यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती. अटक केलेल्यांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन...

October 12, 2025 1:01 PM October 12, 2025 1:01 PM

views 17

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, मेघायल, कर्नाटकचा समुद्रकिनारा, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि कर्नाटकचा दक्षिणी भागातही जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. प...