राष्ट्रीय

June 25, 2024 8:25 PM June 25, 2024 8:25 PM

views 19

देशात काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या, हिमालयाकडच्या भागांत, आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातल्या काही भागांमध्...

June 25, 2024 8:32 PM June 25, 2024 8:32 PM

views 11

लोकसभेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक

लोकसभेच्या सभापतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. विरोधकांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे.   लोकसभेच्या सभापतींची निवड एकमतानं आणि बिनविरोध व्हायला हवी असं ...

June 25, 2024 7:12 PM June 25, 2024 7:12 PM

views 28

नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक

राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात आज बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या...

June 25, 2024 3:17 PM June 25, 2024 3:17 PM

views 15

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला – मंत्री प्रल्हाद जोशी

स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते.  ऊसापासून साखर तर त्याच...

June 25, 2024 3:11 PM June 25, 2024 3:11 PM

views 14

कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा- एलआयसी

विमा पॉलिसी महामंडळाला समर्पित करण्यासाठी काही संस्थांकडून दिल्या जात असलेल्या प्रस्तावांबाबत भारतीय आयुर्विमा महामंडळानं स्पष्टीकरण दिलं आहे. अशा संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उत्पादनांशी आपला कसलाही संबंध नसल्याचं महामंडळानं सांगितलं आहे. असा कोणताही प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पॉलिसीधारकांन...

June 25, 2024 3:10 PM June 25, 2024 3:10 PM

views 8

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्तगिती

दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती दिली आहे. ईडीनं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देताना दिलं आहे.

June 25, 2024 2:51 PM June 25, 2024 2:51 PM

views 5

६४व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार

नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत साखर आणि जैव इंधन क्षेत्रातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत ३० हून अधिक देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ८० हून अधिक ...

June 25, 2024 2:47 PM June 25, 2024 2:47 PM

views 7

झारखंडमध्ये ७ माओवादी ताब्यात

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यातल्या इचाबार इथून, बंदी असलेल्या कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेतलेल्या, तृतीय सम्मेलन प्रस्तुती समिती या प्रतिबंधीत गटाच्या सात सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या माओवाद्यांकडून दोन बंदुका आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

June 25, 2024 2:05 PM June 25, 2024 2:05 PM

views 4

९६ हजार कोटींहून अधिक रकमेच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु

अस्तित्वात असलेल्या दूरसंचार सेवा विकसित करण्यासाठी आणि सेवेत सातत्य राखण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं आज ९६ हजार कोटींहून अधिक रकमेच्या दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु केला आहे.

June 25, 2024 1:59 PM June 25, 2024 1:59 PM

views 16

७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली

आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी ७वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.