राष्ट्रीय

July 8, 2024 7:54 PM July 8, 2024 7:54 PM

views 13

झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंड राज्याच्या विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव संमत होताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात मावळते मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अन्य ११ आमदारांचा समावेश आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शप...

July 8, 2024 7:06 PM July 8, 2024 7:06 PM

views 10

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. उंच इमारती तसंच २०० पेक्षा जास्त घरं असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याची निवडणूक आयोगाची सूचना आहे. याचा आढावा या बैठकीत झाला. मतदार यादीचं अद्ययावतीकरण, नवीन मतदान केंद्रे उभारणं यासह विविध सूचना ...

July 8, 2024 7:14 PM July 8, 2024 7:14 PM

views 37

नीट युजी पेपर फुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला आदेश

पेपर फुटीची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असेल तरच फेरपरीक्षेचा विचार केला जाईल, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. नीट युजी पेपर फुटीच्या प्रकरणासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासा...

July 8, 2024 3:16 PM July 8, 2024 3:16 PM

views 10

राज्यं आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून मासिक पाळीच्या रजेवर धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्यासंदर्भात राज्यं आणि इतर संबंधित संस्थांशी चर्चा करून एक धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. महिला कल्याण मंत्रालयानं यासंदर्भात संबंधितांशी बैठका घ्याव्यात आणि यासंदर्भात धोरण तयार करण्याचा विचार करावा, असं सरन्...

July 8, 2024 12:59 PM July 8, 2024 12:59 PM

views 36

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रीया दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. त्याआधी विमानतळावरुन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, भा...

July 8, 2024 11:00 AM July 8, 2024 11:00 AM

views 15

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊ...

July 8, 2024 10:46 AM July 8, 2024 10:46 AM

views 16

अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक

जम्मू आणि काश्मीरमधील अमली पदार्थांच्या वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातील प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सलीम अंद्राबी जून 2020 पासून फरार होता. या अटकेमुळे नार्को-दहशतवाद संबंध नष्ट करण्याच्या आणि भारतात अमली पदार्थांच...

July 7, 2024 8:29 PM July 7, 2024 8:29 PM

views 11

के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची बसपा पक्षप्रमुख मायावती यांची मागणी

बहुजन समाज पार्टीचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. चेन्नई इथं आर्मस्ट्राँग यांच्या पार्थिवाला पुष्पांजली वाहिल्यानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या. राज्यातल्या दुर्बल घटकांचं रक्षण करण्याचं आणि कायदा आणि...

July 7, 2024 8:25 PM July 7, 2024 8:25 PM

views 5

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा विरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिपणी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेखा शर्मा यांनी केलेल्या तक्रारीनंतर मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ७९ कलमाअंतर्गंत गुन्ह...

July 7, 2024 7:39 PM July 7, 2024 7:39 PM

views 10

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय  नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात  संबंधित १० गटांमधले १२० हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार स...