राष्ट्रीय

July 9, 2024 7:55 PM July 9, 2024 7:55 PM

views 10

२०२३ – २४ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांनी विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनांनी २०२३ - २४ या काळात पहिल्यांदाच विक्रीचा १ लाख ५५ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.  प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योगानं ...

July 9, 2024 7:52 PM July 9, 2024 7:52 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज रशियातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपॉस्टल या नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हा सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना दिला. रशिया आणि भारत देशांतील विशेषाधिकार धोरणात्मक भागिदारी विकसीत करण्या...

July 9, 2024 7:01 PM July 9, 2024 7:01 PM

views 14

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

आगामी काळात भारत- रशिया संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. भारत - रशिया शिखर परिषदेप्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. गेली ४०-५० वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे, त्यामुळे मॉस्कोमधल्...

July 9, 2024 3:01 PM July 9, 2024 3:01 PM

views 7

पेट्रोलियम वितरण कंपन्या बोगस ग्राहक हुडकून काढण्यासाठी ई – के वाय सी मोहीम राबवत आहेत – मंत्री हरदीप सिंह पुरी

पेट्रोलियम वितरण कंपन्या बोगस ग्राहक हुडकून काढण्यासाठी ई - के वाय सी मोहीम गेल्या आठ महिन्यांपासून राबवत आहेत , असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. एल पी जी गॅस सिलिंडरचं वितरण करतेवेळी मोबाईल अँपचा वापर करून आधार क्रमांकासह ग्राहकांचे इतर तपशील तपासले जातात, याव...

July 9, 2024 2:10 PM July 9, 2024 2:10 PM

views 8

जम्मू काश्मीरमधे दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलांची शोधमोहीम सुरू

जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठुआ जिल्ह्यातल्या माचेडी भागात संरक्षण दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हेलिकॉप्टर, बॉम्बशोधक श्वान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही मोहीम राबवली जात आहे. परकीय देशातून आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल...

July 9, 2024 11:33 AM July 9, 2024 11:33 AM

views 9

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा यांचे तीन रथ पुरीच्या श्री गुंडीचा मंदिरात पोहोचले

भगवान जगन्नाथाचा - नंदीघोष, देवी सुभद्रा आणि भगवानसुदर्शन यांचा - देवदालन आणि भगवान बलभद्राचा - तालध्वज हे तीन रथ काल पुरीच्या रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर प्रथेनुसार जागेवरच थांबवण्यात आले. आज तिथूनच त्यांच्या मावशी- देवी गुंडीच्या देवीच्या मंदिरात असंख्य भाविक हे रथ पुन्हा पुढे ओढून नेतील. या पवित...

July 9, 2024 10:32 AM July 9, 2024 10:32 AM

views 11

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत काय पावलं उचलली याची माहिती देणारी प्रतिज्ञापत्रं उद्या संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्याया...

July 8, 2024 8:10 PM July 8, 2024 8:10 PM

views 7

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी दूरसंचार सुविधांमध्ये सुधारणा

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं तिथल्या दूरसंचार सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करायचं ठरवलं आहे. अपेक्षित सुधारणांमुळं अमरनाथ यात्रेतला  लखनपूर ते काझीगंड तसंच काझीगंड ते पहलगाम आणि बलताल पर्यंतचा पट्टा 2G, 3G आणि  4G  सुविधांनी युक्त होणार आह...

July 8, 2024 8:05 PM July 8, 2024 8:05 PM

views 3

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात ...

July 8, 2024 8:00 PM July 8, 2024 8:00 PM

views 8

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक दिवसीय मणिपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आसामच्या कचार इथल्या पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात आश्रयाला आलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. इन्फाळला भेट दिल्यानंतर राहुल गांधी चुराचांदपूरकडे   रवाना झाले. तिथे मदत के...