राष्ट्रीय

August 8, 2024 7:31 PM

views 29

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ – आरबीआय

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ मिळत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२९ सालापर्यंत अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून भारतात येणारं परकीय चलन १६० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं यात म्हटलं आहे.

August 8, 2024 7:25 PM

views 38

भारतानं शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं – गुंतवणूक तज्ज्ञ

गेल्या काही दशकांमध्ये भारतीय शेअर बाजारानं जगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केल्याची प्रतिक्रिया गुंतवणूक तज्ज्ञांनी नोंदवली आहे. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून अर्थार्जन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे कल वाढल्याचं यात म्हटलं आहे.

August 8, 2024 7:11 PM

views 58

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी भारताचे प्रयत्न

२०३६च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ऑलिंपिकचे भविष्यातले यजमान ठरवणाऱ्या समितीसोबत संवाद सुरू केला आहे. राज्यसभेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी क्रीडा पायाभूत ...

August 8, 2024 7:04 PM

views 18

अणुऊर्जेमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी देशाचे प्रयत्न – राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह

अणुऊर्जेमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी देशानं सातत्यानं प्रयत्न केल्याचं सरकारनं आज राज्यसभेत सांगितलं. भारतानं अणु आणि संबंधित इंधन तंत्रज्ञानात सर्वसमावेशक क्षमता प्राप्त केली असल्याचं राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. सध्याची अणुऊर्जा क्षमता ८ हजार १८० मेगावॅट वर...

August 8, 2024 6:52 PM

views 18

कोविडनंतर सरकार भांडवली खर्चात सर्वाधिक वाढ – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

कोविडनंतर सरकार भांडवली खर्चात जास्तीत जास्त वाढ करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. राज्यसभेत वित्त विधेयक, विनियोजन विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर विनियोग विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. २०२३-२४ या आर्थिक प्रभावी भांडवली खर्च १५ लाख कोटीपेक्षा जास...

August 8, 2024 6:45 PM

views 16

लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ सादर

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आज लोकसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ सादर केलं. हे विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही विमानासाठी किंवा विमानांच्या श्रेणीसाठी, विमानाच्या ऑपरेशनच्या सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही हवाई अपघाताच्या किंवा घटनेच्या तपासासाठी नियम बनविण्याचे अधि...

August 8, 2024 6:39 PM

views 10

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख नागरिकांची नोंदणी – मंत्री जीतन राम मांझी

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख जणांनी नोंदणी केली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. उद्यम पोर्टल, पीएम विश्वकर्मा योजना आणि या क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे २० कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचही त्यांनी म्हटलं आहे. क्रेडि...

August 8, 2024 3:58 PM

views 25

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. ...

August 8, 2024 8:12 PM

views 16

भारतीय रिझर्व बँकेचं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग नवव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याज दर सव्वा सहा टक्के, तसंच मुदत ठेवींवरचा व्याज दर आ...

August 8, 2024 8:18 PM

views 21

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आज सकाळी वेलिंग्टन इथं पोहोचल्या. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेलिंग्टन रेल्वे स्थानका समोरच्या उद्यानातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.