राष्ट्रीय

August 9, 2024 3:32 PM

views 28

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मालदीवच्या ३ दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. हिंद महासागर क्षेत्रात महत्वपूर्ण सामरिक भौगोलिक स्थान असलेला मालदीव हा भारताचा प्रमुख शेजारी देश आहे.  

August 9, 2024 1:32 PM

views 21

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.   हा स्वातंत्रलढ्याच्या चळवळीला  कलाटणी देणारा महत्वपूर्ण दिवस आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आह...

August 9, 2024 1:29 PM

views 19

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने कथित अबकारी धोरणातल्या अनियमितता प्रकरणी जामीन मंजूर केला आहे.   सिसोदिया सतरा महिन्यांपासून कोठडीत होते, मात्र त्यांच्यावर अजूनही खटला सुरू झाला नाही. त्यामुळे जलद सुनावणी करण्याच्या त्यांच्या अधिकार...

August 9, 2024 1:26 PM

views 21

देशाच्या परकीय चलन भांडारात ६७० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा

भारताच्या परकीय चलन भांडारात जुलै २०२४ च्या शेवटच्या हप्त्यात ४ अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. देशाच्या परकीय चलन भांडारात सध्या ६७० अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.   परकीय चलन भांडाराचा हा आतापर्यंतचा सर्वात विक्रमी स्तर असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. दरम...

August 9, 2024 1:23 PM

views 30

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांच्या संख्येत पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटीवर पोहोचली होती. हा आकडा गाठण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागला होता. मात्र, त्यानंतर सुमारे  ६ ते ७ महिन्यात पुढचे १ कोटी नोंदणीकृत गु...

August 9, 2024 1:11 PM

views 23

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ऑकलंड भारतीय समुदायाशी संवाद साधणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दोन दिवसीय न्यूझीलंड दौऱ्यात आज ऑकलंड इथं आयोजित एका नागरी स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायाशी आणि भारताच्या मित्र परिवाराशी संवाद साधणार आहेत. न्यू झीलंडमध्ये ३ लाखाहून अधिक भारतीय राहतात.    दरम्यान, न्यू झीलंड बरोबरचे राजनैतिक  संबंध अधिक दृढ करण्यासाठी ...

August 8, 2024 8:22 PM

views 41

ॲपल कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार

आयफोन निर्मिती करणारी ॲपल ही कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार आहे. भारतातली आयफोनची विक्री ८ बिलियन डॉलर इतकी झाल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी फोन संचाची निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी तामिळनाडूच्या श्रीपरंबदूर इथं आयपॅडचा निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे.

August 8, 2024 8:11 PM

views 27

कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांचं निदर्शन

कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी खासदारांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार म...

August 8, 2024 8:08 PM

views 30

देशातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी – मंत्री सी आर पाटील

सरकारनं जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे असं पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं. या योजने अतंर्गत आतापर्यंत १५ कोटी कुटुंबांना नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

August 8, 2024 7:33 PM

views 46

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.