राष्ट्रीय

August 11, 2024 1:52 PM

views 15

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान,  गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झाल...

August 11, 2024 1:33 PM

views 20

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याची गरज – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाच्या समारोप  सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.  भारत जगातील सर्वात मोठ...

August 11, 2024 6:42 PM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ

देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला....

August 11, 2024 1:17 PM

views 19

आज नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा…

नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा आज होत  आहे. नॅशनल मेडिकल सायन्स एक्झामिनेशन बोर्ड  दोन सत्रांमध्ये  ही परीक्षा घेणार आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसले आहेत. जूनमध्ये परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  स्पर्धा परीक्षांवर झालेल्या ...

August 11, 2024 1:10 PM

views 16

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह यांचं निधन

माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कौटुंबियांनी सांगितलं. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानच्य...

August 11, 2024 1:36 PM

views 19

अमेरिकेतल्या हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांचे सेबीकडून खंडन

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या गुंतवणूक आणि संशोधन संस्थेनं केलेले आरोप फेटाळले आहेत. बुच दांपत्याचा अदानी समुहाशी संबंधित ऑफ-शोअर संस्थांमध्ये सहभाग असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला होता. यासंदर्भात धवल  बुच यांनी एक निवेदन जारी केलं असून, आप...

August 11, 2024 1:15 PM

views 36

‘कशूर रिवाज’ सांस्कृतिक महोत्सवात तरुणींच्या सर्वात मोठ्या काश्मिरी लोकनृत्याचा जागतिक विक्रम

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित कशूर रिवाज या सांस्कृतिक महोत्सवात आतापर्यंत दहा हजार मुलींनी सर्वाधिक संख्येनं काश्मिरी लोकनृत्य सादर करून विश्वविक्रम केला आहे. ‘यूआरएफ’ अर्थात, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे लोकनृत्य स...

August 11, 2024 9:47 AM

views 27

हिरे आयातविषयक परवान्याची उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी काल डायमंड इंपरेस्ट लायसन्स म्हणजे हिरे आयातविषयक परवान्याची घोषणा केली. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनात एका मुलाखतीत ते बोलत होते. या परवान्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना लाभ हो...

August 11, 2024 1:33 PM

views 26

वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. य...

August 11, 2024 1:13 PM

views 22

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीची कॅबिनेट सचिव म्हणून टी. व्ही. सोमनाथन यांच्या नियुक्तीला मंजुरी

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने  काल  टी. व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली. सोमनाथन यांची या महिन्याच्या ३० तारखेपासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या तामिळनाडू केडरच्या १९८७च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. सोमन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.