राष्ट्रीय

August 12, 2024 7:41 PM

views 15

जूनमधे औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ

यंदा जून महिन्यात देशातल्या औद्योगिक उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ झाल्याची माहिती, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. खणन क्षेत्रात १० पूर्णांक ३ दशांश टक्के, कारखानदारी क्षेत्रात २ पूर्णांक ६ दशांश टक्के, तर वीज क्षेत्रात ८ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ नोंदवली गेली आहे...

August 12, 2024 6:36 PM

views 14

देशातल्या शैक्षणिक संस्थांच्या मानांकनात आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातल्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत सर्वसाधारण गटात पहिला क्रमांक आयआयटी मद्रासने पटकावला असून आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरा क्रमांक बंगळुरूच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स ला मिळाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या...

August 12, 2024 3:50 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला ‘मन की बात’ मधून देशवासियांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय ज...

August 12, 2024 3:42 PM

views 21

पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्...

August 12, 2024 3:23 PM

views 24

हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी,  असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नि...

August 12, 2024 3:20 PM

views 38

गुंतवणूकदारांना हिंडेनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला नाही, असा भाजपाचा दावा

देशाची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून शेअर बाजार पूर्णपणे मजबूत असल्याचं भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांना हिंडेनबर्ग आणि काँग्रेसचं कारस्थान लक्षात आलं असल्याने शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला नाही, असा दावा त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. अशा अफवांच्या मा...

August 12, 2024 1:39 PM

views 25

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले ९ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठान...

August 12, 2024 1:36 PM

views 12

हातमाग, हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी देशात विविध उपक्रम – मंत्री गिरीराज सिंह

देशांतर्गत हातमाग आणि हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या हातमाग प्रदर्शनात बोलत होते. तरूणांसाठी हातमाग फॅशन बनलं असून अशा कारागिरांना नवीन डिझाईन्स सादर करण्यासाठी...

August 12, 2024 1:20 PM

views 19

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची याचिका

कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.  या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी ...

August 12, 2024 1:12 PM

views 23

बिहारमधल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू

बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला असून १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. भाविक आणि स्थानिक दुकानदार यांच्यात मध्यरात्री एक वाजता भांडण झाल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना झाली, असं जहानाबादचे पोलीस निरीक्षक अरवि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.