राष्ट्रीय

September 11, 2024 7:36 PM

views 27

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या  ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं.  आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारां...

September 11, 2024 7:32 PM

views 29

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे   राऊज ॲव्हन्यू न्यायालयातील सुनावणीसाठी तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना हजर केलं....

September 11, 2024 6:49 PM

views 23

भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही – गृहमंत्री अमित शाह

भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असं ते म्हणाले.  देशाचं विभाजन कर...

September 11, 2024 8:32 PM

views 28

राष्ट्रपतींच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२४ वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १५ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील आशा बावणे यांचा समावेश आहे.   केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १९७३ मध्ये राष्ट्रीय फ्लोरे...

September 11, 2024 6:42 PM

views 23

देशाच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या सर्वंकष विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीमाप्रांत विकासविषयक परिषदेत ते बोलत होते. देशाच्या सीमावर्ती भागातल्या खेड्यांना प्राथमिकता देण्यात आली असून त्यांच्या ...

September 11, 2024 6:29 PM

views 20

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची चौथी यादी जाहीर

आप अर्थात आम आदमी पार्टीनं आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून  त्यात २१ उमेदवारांचा  समावेश आहे. या पक्षानं सोनिपतमधून देवेंदर गौतम, गुरगावमधून निशांत आनंद,  अंबाला मधून राज कौर गिल तर कर्नाल मधून सुनील बिंदल यांना उमेदवारी दिली आहे. 

September 11, 2024 6:25 PM

views 27

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला प्रारंभ

प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला आज नवी दिल्लीत केंद्रीय मत्स्य उद्योग मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या भागातल्या मच्छीमार समाजाला संघटित क्षेत्रात परावर्तित करण्यासाठी  या डिजिटल व्यासपीठचं सदस्य होण्याकरिता प्रवृत्त ...

September 11, 2024 6:12 PM

views 38

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याने आपल्या परदेश दौऱ्यादरम्यान अशी निराधार आणि दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं हे लज्जास्पद असून देशाच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारं आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. भारतात शिख समुुदायाला त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाचं पालन करू दि...

September 11, 2024 3:24 PM

views 14

गुजरातमध्ये कच्छ विभागात अज्ञात तापामुळे ११ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये कच्छ विभागातल्या अबदासा आणि लाखपत इथं गेल्या काही आठवड्यात एका अज्ञात तापामुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या सोळा मृत्यूंपैकी ११ मृत्यू अज्ञात तापामुळे झाले असून पाच मृत्यू इतर आजारामुळे झाल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री ऋषीके...

September 11, 2024 2:14 PM

views 15

आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट

आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री पय्यावुला केशव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देत त्यावर चर्चा केली. पुरामुळे अनेक नागरिकांचं मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.