राष्ट्रीय

August 24, 2024 6:41 PM August 24, 2024 6:41 PM

views 15

नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या २५ जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने  भारतात आणण्यात ...

August 24, 2024 5:39 PM August 24, 2024 5:39 PM

views 19

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं आवाहन

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं आहे भारताला सुदृढ राष्ट्र बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाचा पुनरुच्चार मांडवीय यांनी यावेळी केला. प्रधानमंत्र्यांच्या फिट इंडिया चळवळीचं महत्व अधोर...

August 24, 2024 3:00 PM August 24, 2024 3:00 PM

views 1

पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सवाचं दोन दिवस मध्यप्रदेशात देवास इथं आयोजन

पंडित कुमार गंधर्व स्मृती महोत्सव आजपासून दोन दिवस मध्यप्रदेशात देवास इथं आयोजित करण्यात येत आहे. या समारंभात प्रसिद्ध गायिका विदुषी सुधा रघुरामन यांना कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागातल्या कलाकारांचे कार्यक्रम महोत्सवात होणार आहेत. त्यात शांतनु गोखल...

August 24, 2024 4:01 PM August 24, 2024 4:01 PM

views 16

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा

गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम इथं उद्या अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणा...

August 24, 2024 2:47 PM August 24, 2024 2:47 PM

views 13

देशातल्या मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे कृत्रिम वस्त्राची मागणी वाढत आहे- वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह

कृत्रिम वस्त्र हे आपल्या दैंनदिन जीवनाचा भाग बनले आहे. देशातल्या मध्यमवर्गीयांच्या राहणीमानात सुधारणा झाल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे, असं केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं. ते मुंबईत आयोजित केलेल्या १० व्या नॉन वोवन टेक आशिया आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात बोलत होते. कृत्रिम वस्त्र...

August 24, 2024 2:32 PM August 24, 2024 2:32 PM

views 6

आसाममधल्या धिंग इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा मृत्यू

आसाममधल्या धिंग इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा आज सकाळी मृत्यू झाला. गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर त्याने तलावात उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला. नागाव जिल्ह्यातील धि...

August 24, 2024 3:50 PM August 24, 2024 3:50 PM

views 13

युक्रेन शांतिपरिषदेची दुसरी फेरी भारतात घेण्याचा वोलोदिमीर झेलेन्सकी यांचा प्रस्ताव

शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. युक्रेन दौरा यशस्वीपणे पूर्ण करुन प्रधानमंत्री आज मायदेशी परतले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी विधायक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर लिहीलं असून युक्रेनमधल्या पाहुणच...

August 24, 2024 7:20 PM August 24, 2024 7:20 PM

views 13

मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

  आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग आहे.  हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या...

August 24, 2024 1:27 PM August 24, 2024 1:27 PM

views 11

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे – मंत्री पियूष गोयल

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं. W.I.R.C अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक कौन्सिलच्या ३८ व्या परिषदेत, ‘विकसित भारत : २०४७’ या विषयावर गोयल काल बोलत होते. भारताच्या वाढीचा दर सात टक...

August 24, 2024 1:18 PM August 24, 2024 1:18 PM

views 10

नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय दूर संपर्क मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे यांनी दूरसंचार सेवा पुरवठादारांसोबत काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सेवेची...