राष्ट्रीय

August 26, 2024 1:40 PM August 26, 2024 1:40 PM

views 12

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दि...

August 26, 2024 1:28 PM August 26, 2024 1:28 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांच्याशी संवाद साधला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध आणि सहकार्य, तसंच क्वाडबद्दल यावेळी चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली आहे.

August 26, 2024 1:25 PM August 26, 2024 1:25 PM

views 7

डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचं क्रांतिकारी पाऊल – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

आर्थिक व्यवहारांसाठी उपयोगी असणाऱ्या GEM, UPI आणि ULI या तीन पद्धतींमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये भारतानं क्रांतिकारी पाऊल टाकल्याचं प्रतिपादन रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. रिझर्व बँकेच्या नव्वदाव्या वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून बेंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्र...

August 26, 2024 1:17 PM August 26, 2024 1:17 PM

views 17

लडाखमध्ये पाच नवे जिल्हे तयार करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

लडाख या केंद्रशासीत प्रदेशात पाच नवे जिल्हे तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ही माहिती दिली. नव्या रचनेनुसार लडखमध्ये जास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच जिल्हे तयार केले जाणार आहेत.

August 26, 2024 1:34 PM August 26, 2024 1:34 PM

views 11

भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई युद्धनौका कोलंबोत दाखल

भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासासाठी भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई ही युद्धनौका आज कोलंबोत पोहोचली.  श्रीलंकेच्या नौदलाने या युद्धनौकेचं उत्साहात स्वागत केलं. आयएनएस मुंबई या युद्धनौकेची या वर्षातील ही पहिली श्रीलंका भेट असून भारतीय नौदलाच्या जहाजाची ही आठवी श्रीलंका यात्रा आहे. आपल्...

August 26, 2024 1:05 PM August 26, 2024 1:05 PM

views 9

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो वीईरा यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. वीईरा यांच्या भेटीमुळे भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान धोरणात्मक भागीदारीला चालना मिळेल, असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मौरो...

August 26, 2024 12:59 PM August 26, 2024 12:59 PM

views 22

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेतल्या राष्ट्रीय नागरी हक्क संग्रहालयाला भेट दिली आणि टेनेसी मधल्या मेम्फिस इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौऱ्याचा  काल शेवटचा दिवस होता. मेम्फिस, अटलांटा आणि नॅशव्हिल इथल्या भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना सिंग यांनी भारतीय ...

August 26, 2024 9:27 AM August 26, 2024 9:27 AM

views 16

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सिंगापूर दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सिंगापूरमध्ये विविध जागतिक व्यावसायिक नेत्यांशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की, भारतातील गुं...

August 26, 2024 1:02 PM August 26, 2024 1:02 PM

views 9

‘देश अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प आता देशवासियांचा संकल्प’

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल छत्तीसगडमधील नवा रायपूर इथं अंमली पदार्थ नियंत्रण कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचं दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधल्या अंमली पदार्थांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठ...

August 25, 2024 8:33 PM August 25, 2024 8:33 PM

views 6

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी – प्रधानमंत्री

न्याय प्रक्रीया क्लिष्ट असून ती सोपी आणि स्पष्ट करणं ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जयपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.    न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलल...