August 27, 2024 1:37 PM August 27, 2024 1:37 PM
17
गुजरातमध्ये गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत
गुजरातमध्ये गेले दोन दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अहमदाबाद, बडोदा, सुरत आणि नवसारीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे ५०० रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सखल भागातल्या सुमारे १७ हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे...