September 13, 2024 3:04 PM September 13, 2024 3:04 PM
15
पश्चिम बंगालमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ईडीचे छापे
अन्न पुरवठा आणि वितरण भ्रष्टाचार प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मेदिनीपूर, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा, नादिया आणि कोलकाता यासह अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. विविध गोदामं, रास्त भाव दुकाने आणि रेशन विक्रेत्यांच्या घरांची तपासणी सुरू आहे.