राष्ट्रीय

September 25, 2024 3:09 PM September 25, 2024 3:09 PM

views 8

बिहारच्या मारहोरा इथं रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात – रेल्वे मंत्रालय

बिहारच्या मारहोरा इथे सुरू असलेल्या रेल्वे इंजिन प्रकल्पातून प्रथमच निर्यातीची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. वेबटेक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या या प्रकल्पातून आफ्रिकेत रेल्वे इंजिनाची निर्यात करण्यात येईल. पुढच्या वर...

September 25, 2024 2:53 PM September 25, 2024 2:53 PM

views 9

न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान कोणतीही पूर्वग्रहदूषित टिप्पणी करू नये – सर्वोच्च न्यायालय

न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान कोणतीही पूर्वग्रहदूषित टिप्पणी करू नये अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका सुनावणीवेळी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठाने सुनावणी केली, त्यावेळ...

September 25, 2024 2:44 PM September 25, 2024 2:44 PM

views 23

दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल

शेतात कृषी कचरा जाळल्याने राजधानी दिल्लीत होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने काय पावलं उचलली याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मागवला आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसी यांच्या पीठाने आज हे निर्देश दिले. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमधे कापणी नंतरचा कचरा ...

September 25, 2024 2:38 PM September 25, 2024 2:38 PM

views 19

१५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ काश्मीरला भेट

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी १५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज काश्मीरला भेट दिली. यात अमेरिका, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्...

September 25, 2024 2:26 PM September 25, 2024 2:26 PM

views 5

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात जागा वाटप जाहीर केलं जाईल, असं भाजपाचे राज्य सहप्रभारी हिमंता बिस्व शर्मा यांनी सांगितलं.

September 25, 2024 8:19 PM September 25, 2024 8:19 PM

views 15

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. देशातल्या १४० कोटी नागरिकांचा एकत्र निर्धार यातून दिसून येतो. यामुळं विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रधा...

September 25, 2024 3:16 PM September 25, 2024 3:16 PM

views 17

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होणार

वक्फ सुधारणा विधेयकाचं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन झालेली संसदेची संयुक्त समिती आपला अहवाल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करेल, अशी अपेक्षा केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्री किरेन रिजुजु यांनी व्यक्त केली. समितीला एक कोटीपेक्षा जास्त निवेदनं प्राप्त झाली असंही रिजुजु यांनी सांगितलं. कें...

September 25, 2024 9:55 AM September 25, 2024 9:55 AM

views 15

शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं तत्काळ लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश

सर्वोच्च न्यायालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘शाळांमधील मुलांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुलांची सुरक्षा आणि हक्क यांच्या संरक्षणासाठी स्थापित राष्ट्रीय आयोगाला राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय सा...

September 25, 2024 9:51 AM September 25, 2024 9:51 AM

views 7

पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्यातील वाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सर्वोच्च न्यायालयानं पंजाबमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनिवासी भारतीयांसाठीच्या राखीव कोट्याच्या विस्ताराबाबत ताशेरे ओढले आहेत. ही फसवणूक असून, यामुळं अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना मागील दाराने प्रवेश मिळण्याची संधी दिली जात आहे आणि देशातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यापासून वंचित ठेवलं...

September 25, 2024 9:45 AM September 25, 2024 9:45 AM

views 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांच्या काळात या सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सरकारनं देशातील युवा शक्तील...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.