राष्ट्रीय

October 18, 2024 7:54 PM

views 10

आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं आज मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. जैन यांचा संबंध असलेल्या चार कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाखाली त्यांनी ईडीनं ३० मे २०२२ रोजी अटक केली होती.

October 18, 2024 7:50 PM

views 20

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी आज पुंछ जिल्ह्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताकडून चार ग्रेनेड जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूंछ शहर आणि सुरनकोट शहरात झालेल्या दोन ते तीन ग्रेनेड हल्ल्यांशी या व्यक्तीचा संबंध असल्याचा पुंछ पोलिसांना संश...

October 18, 2024 6:44 PM

views 30

राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची मुदत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत

राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना मदत केली जाते. या शिष्यवृत्तीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गंत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे त्यांना १२ वी पर्यंतचं शिक्षण घेता ये...

October 18, 2024 3:32 PM

views 28

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत-सर्वोच्च न्यायालय

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने आज बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म...

October 18, 2024 3:14 PM

views 33

प्रधानमंत्री उद्या कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचे उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचं उद्घाटन दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सभागृहात करणार आहेत. या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहा दरम्यान विविध मंत्रालये आणि संस्था यांच्याद्वारे परिसंवाद आणि कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे.  

October 18, 2024 3:51 PM

views 18

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्यानं युवक आणि खासगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा-संरक्षण मंत्री

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे आयोजित डेअर टू ड्रीम फाईव्ह पॉईंट झीरो या नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ड्रोन, सायबर युद्ध, ...

October 18, 2024 3:54 PM

views 19

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. २५ ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात सर्वच रा...

October 18, 2024 10:01 AM

views 20

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्कॅम से बचो अभियान सुरू

ऑनलाइन गैरव्यवहारांच्या वाढत्या धोक्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा कंपनीनं स्कॅम से बचो हे अभियान सुरू केलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय तसंच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र यांनी मिळून या अभियानाचा आराखडा निश्चित ...

October 18, 2024 10:13 AM

views 13

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मालावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.