राष्ट्रीय

October 3, 2024 10:55 AM October 3, 2024 10:55 AM

views 16

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार

हरयाणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. इथं ९० जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी जम्मू-काश्मीरसह ८ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर क...

October 3, 2024 1:27 PM October 3, 2024 1:27 PM

views 6

खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ५५ हजार कोटी रुपयांच्या वर

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं सूतकताई कामगार आणि हातमाग विणकरांच्या वेतनात वाढ केली आहे. त्यानुसार आता सूतकताई कामगारांना २५ टक्के तर हातमाग विणकरांना ७ टक्के अधिक वेतन मिळेल. गेल्या १७ सप्टेंबरला जाहीर झालेला हा निर्णय कालपासून लागू झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयुक्त मनोज कु...

October 3, 2024 10:17 AM October 3, 2024 10:17 AM

views 8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या उदयपूर येथील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या 32 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. उद्या, राष्ट्रपती माउंट अबू येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित जागतिक शिखर परिषदेल...

October 3, 2024 1:27 PM October 3, 2024 1:27 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाच्या तारखेत वाढ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या  इ-लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेट वस्तूंच्या लिलावाची ही ६वी आवृत्ती असून यातून मिळणारं धन नमामि गं...

October 3, 2024 1:32 PM October 3, 2024 1:32 PM

views 7

नवी दिल्लीत भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात सुरक्षितता आणि भूराजकीय संदर्भ या विषयावर भारतीय नौदलाची तीन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्ली इथं होत आहे. सागरी क्षेत्रात साधनसंपत्तीचे नवे स्रोत आणि त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचे परिणाम याविषयी परिषदे उच्च स्तरीय विचारविमर्श होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उ...

October 3, 2024 1:30 PM October 3, 2024 1:30 PM

views 10

इस्रायल-लेबनॉनमधल्या तणावामुळे विमानसेवा प्रभावित

मध्यपूर्वेत तणाव वाढल्यामुळे हवाई वाहतुक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. फ्लाईट रडार २४च्या माहितीनुसार, जगभरातल्या विमान कंपन्या त्यांची विमानं अन्य मार्गाने वळवत आहेत किंवा रद्द करत आहेत, तर लेबनॉन, इस्रायल आणि कुवेतमधील प्रादेशिक विमान उड्डाणांना विलंब होत आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी ...

October 2, 2024 8:08 PM October 2, 2024 8:08 PM

views 8

बिहारमधे आणखी काही भागांना पुराचा तडाखा, पूरग्रस्तांची संख्या १५ लाखावर

बिहारमधे, पुराच्या तडाख्यात आज आणखी काही भाग आल्यानं पूरग्रस्तांची संख्या सुमारे १५ लाख झाली आहे. कोसी, गंडक, महानंदा, कमलाबालन, बागमती, आणि इतर नद्यांची पाणीपातळी वाढली असून, राज्यातल्या इतर सखल भागातही ते पसरलं आहे. सीतमढी, दरभंगा, पश्चिम चंपारण, मधुबनी, सुपौल आणि सहर्सा या भागांना जास्त तडाखा बसल...

October 2, 2024 7:59 PM October 2, 2024 7:59 PM

views 4

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. महात्मा गांधी यांची आज १५५ वी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  प्रधा...

October 2, 2024 7:57 PM October 2, 2024 7:57 PM

views 12

स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम

गांधी जयंतीनिमित्त आज सर्वत्र स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्त नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत भाग घेतला. यावेळी स्वच्छतेशी संबंधित नऊ हजार सहाशे कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचा प्रारंभ त्यांच्य...

October 2, 2024 7:56 PM October 2, 2024 7:56 PM

views 17

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाचा विकास होईल या वचनानुसार केंद्र सरकार कार्यरत – प्रधानमंत्री

आदिवासी समाजाची वेगानं प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल या महात्मा गांधींच्या वचनानुसार केंद्र सरकार कार्य करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झारखंडमध्ये हजारीबाग इथं सुमारे ८३ हजार ३०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घ...