राष्ट्रीय

October 9, 2024 11:41 AM October 9, 2024 11:41 AM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १० तारखेपासून लाओसमधील व्हिएन्टिनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, 10 तारखेपासून लाओसमधील व्हिएन्टिनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहतील. लाओस आसियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत. शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान काही द्विपक्षीय...

October 9, 2024 9:58 AM October 9, 2024 9:58 AM

views 6

अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या वसतिगृहाचं सिल्लोड इथं भूमीपूजन

केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून अल्पसंख्याक, दुर्बल आणि गरजू घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास केला जाईल, असं प्रतिपादन, केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात ...

October 8, 2024 8:49 PM October 8, 2024 8:49 PM

views 2

अटल पेन्शन योजनेअंतर्गत आतापर्यंत ५६ लाखांहून अधिक नोंदणी

अटल पेन्शन योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरणानं आज ही आकडेवारी जारी केली. या योजने अंतर्गत मासिक चार ते पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळतं. २०१५ मध्ये विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक स...

October 8, 2024 8:41 PM October 8, 2024 8:41 PM

views 9

अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले. ही इमारत पर...

October 8, 2024 8:27 PM October 8, 2024 8:27 PM

views 6

जम्मू-कश्मिरमधे जनतेनं आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला – नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला

जम्मू-कश्मिरमधे भाजपा आणि मित्रपक्षांच्या राजकारणाला जनतेनं नकार दिला असून, आशा आणि प्रगतीसाठी कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे. गंदरबल इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, येत्या काही दिवसात मित्रपक्षांशी चर्चा करुन पुढचा कृती का...

October 8, 2024 8:09 PM October 8, 2024 8:09 PM

views 9

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय – प्रधानमंत्री

हरयाणातलं भाजपाचं यश हा सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरयाणातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कसलीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयाचं श्रेय समर्पण भावनेनं अथक परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं असल्याचं प्रधानमंत...

October 8, 2024 8:50 PM October 8, 2024 8:50 PM

views 17

हरियाणात भाजपाला तर जम्मूकाश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत

जम्मू आणि काश्मीर तसंच हरियाणा विधानसभा निवडणूकीची मतमोजणी  आज झाली.    जम्मू काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघापैकी ४२ ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाचे उमेदवार २९ ठिकाणी विजयी झाले आहेत. काँग्रेस ६, पीडीपी ३ तर जेपीसी, सीपीएम आणि आपचे उमेदवार प्रत्येकी एका ठिकाणी विजयी ...

October 8, 2024 8:33 PM October 8, 2024 8:33 PM

views 8

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान

चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींनी इतरही कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित केलं. माहित...

October 8, 2024 7:15 PM October 8, 2024 7:15 PM

views 2

मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांचं सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन

भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांनी आज सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

October 8, 2024 7:28 PM October 8, 2024 7:28 PM

views 8

भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार वैज्ञानिक जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना जाहीर

भौतिकशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन या वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी यांत्रिक शिक्षणात केलेल्या संशोधनाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाल्याचं रॉयल स्वीडीश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केलं आहे. जॉन हॉपफिल्ड यांनी प्रतिमा आणि इतर विद...