राष्ट्रीय

October 15, 2024 2:13 PM October 15, 2024 2:13 PM

views 4

परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून स्वीकारला कार्यभार

परमेश शिवमणी यांनी आज भारतीय तटरक्षक दलाचे २६ वे महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. शिवमणी हे नेव्हिगेशन आणि दिशादर्शन क्षेत्राचे तज्ञ असून त्यांनी तटरक्षक दलाच्या महत्त्वाच्या सर्व जहाजांवर सेवा बजावली आहे. ते नवी दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा महाविद्यालय तसंच विलिंग्डन इथल्या सुरक्षा सेवा स्टाफ मह...

October 15, 2024 2:06 PM October 15, 2024 2:06 PM

views 11

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला भर

भारत आणि अल्जेरियामध्ये अधिकाधिक आर्थिक भागिदारी वाढवण्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला आहे. द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं आणि सहकार्यासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी केलं. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्समध्ये काल त्या अल्जेरिया-भारत आर्थिक फोरमला संबोधित करत होत्या.

October 15, 2024 3:58 PM October 15, 2024 3:58 PM

views 15

केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रमाची करणार घोषणा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकींची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आज करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांचं निवडणूक वेळापत्रक जाहीर करेल. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होईल. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या २...

October 15, 2024 1:48 PM October 15, 2024 1:48 PM

views 9

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळी श्रीनगरमध्ये होणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. इथली राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारनं परवाच उठवली होती.  

October 15, 2024 10:04 AM October 15, 2024 10:04 AM

views 17

केंद्रीय गृहमंत्री आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत भारतीय पोलीस सेवेतील प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे प्रशिक्षणार्थी अधिकारी त्यांचे प्रशिक्षण काळातील अनुभव गृहमंत्र्यांना सांगणार आहेत. तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हानांना कशाप्रकारे तोंड देता येईल याचं अमित शहा त्यांना मार्गदर्श...

October 15, 2024 10:00 AM October 15, 2024 10:00 AM

views 4

देशातील 95 टक्के खेडी 4G तंत्रज्ञानाद्वारे जोडली गेली आहेत, उर्वरित गावं 2027 पर्यंत जोडली जातील- डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर

भारताची वसुधैव कुटुंबकमची समृद्ध परंपरा जागतिक मानकांचा अंगिकार करण्यास वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक मानक चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र...

October 15, 2024 9:53 AM October 15, 2024 9:53 AM

views 12

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार

भारत आणि कोलंबिया यांच्यात आज नवी दिल्लीत दृक-श्राव्य कार्यक्रमांच्या सहनिर्मितीबाबत करार करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री जॉर्ज एन्रिके-रोखास रॉड्रिगेझ यांच्यासह दोन्ही देशांचे अन्य प्रतिनिधी या करारावर स्वाक्षरी करतील

October 15, 2024 9:49 AM October 15, 2024 9:49 AM

views 6

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी, संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत झाली बैठक

वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी या विषयावरील संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. तथापि या समितीचं नियमानुसार काम होत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या काही खासदारांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद ...

October 15, 2024 1:55 PM October 15, 2024 1:55 PM

views 6

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी भारतानं डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर भारतात सुरू असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते. आशिया प्रशांत क्षेत्रा...

October 15, 2024 1:45 PM October 15, 2024 1:45 PM

views 3

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी इस्लामाबादला रवाना होणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री ९ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये जात आहेत. या बैठकीदरम्यान पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचं जयशंकर यांनी ...