राष्ट्रीय

October 20, 2024 1:27 PM October 20, 2024 1:27 PM

views 9

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याआधी पक्षाला विचारात घेतलं नाही – मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक...

October 20, 2024 1:28 PM October 20, 2024 1:28 PM

views 13

दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर स्फोट

दिल्लीतल्या रोहिणी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर आज सकाळी स्फोट झाल्याचं वृत्त आहे. घटनेचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. स्फोटात कोणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून जवळच्या दुकानाच्या काचेचं आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या गाडीच्या काचांचं नुकसान झालं आ...

October 20, 2024 1:30 PM October 20, 2024 1:30 PM

views 14

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या अधिक आहे. लग्नसमारंभाहून परत येत असताना बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला. बस चालक आणि वाहक दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना जि...

October 20, 2024 1:17 PM October 20, 2024 1:17 PM

views 2

‘कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातल्या किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करणार’

कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपलं भाजीपाला ५ रुपय...

October 20, 2024 9:58 AM October 20, 2024 9:58 AM

views 7

बिहारमध्ये पुरग्रस्त नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक पाटण्यात दाखल

बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक आज पाटण्यात दाखल होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करेल तसंच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेईल. गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थसारथी या सात सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व ...

October 20, 2024 1:34 PM October 20, 2024 1:34 PM

views 15

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून सात दिवसांच्या सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. सिंगापूरमधल्या दोन दिवसांच्या भेटीत प्रधान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. ते उद्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि उप प्रधानमंत्री गान किम याँग यांची भेट घेणार आहेत. ऑस्...

October 20, 2024 10:34 AM October 20, 2024 10:34 AM

views 15

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील दौरा आटपून मायदेशी परतल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरिया, मॉरिटॅनिया आणि मालावी या देशांचा दौरा पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतल्या आहेत. या तीनही देशांशी संबंधांचा नवा ऐतिहासिक अध्याय त्यांच्या दौऱ्यामुळे जोडला गेला आहे. भारताकडे जी-वीस परिषदेचं अध्यक्षपद असताना आफ्रिका संघ या संघटनेचा कायमस्वरूपी सदस्या बनल्यानंतरचा मु...

October 19, 2024 8:32 PM October 19, 2024 8:32 PM

views 6

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांनी घेतली जम्मू-काश्मीर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मुबारक गुल यांनी आज जम्मू-काश्मीर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगर इथं राजभवनात झालेल्या समारंभात गुल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि अन्य कॅ...

October 19, 2024 8:28 PM October 19, 2024 8:28 PM

views 14

दिल्लीतल्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘खराब’ श्रेणी मध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे.  काल राजधानी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक २९२ इतका नोंदवला गेला.

October 19, 2024 8:13 PM October 19, 2024 8:13 PM

views 3

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ६६ उमेदवारांची यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराइकेला मतदारसंघातून लढणार आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. झारखंड...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.