राष्ट्रीय

November 15, 2024 1:39 PM

views 5

वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन

दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४२० इतक्या अतिगंभीर स्थितीत होता. पुढचे दोन दिवस त्यात धुक्याची भर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढचे आदेश ...

November 15, 2024 2:24 PM

views 24

जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जमुई इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने ६ हजार ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पीएम-जनमन योजनेअंतर्गत बांधलेल्या ११ हजार घरांचा गृहप्रवेशही त्यांनी यावेळी केला. तसंच, त्यांनी भगवा...

November 15, 2024 10:27 AM

views 7

सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ...

November 15, 2024 12:20 PM

views 50

देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं प्रतिपादन

आदिवासी समुदायाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी काल देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं राष्ट्र...

November 14, 2024 8:37 PM

views 22

शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

देशातल्या शेतकऱ्यांमध्ये कुणीही फूट पाडू शकत नाही, शेतकऱ्यांचं ऐक्य हे राष्ट्रवादाचं मूल्य जोपासण्यासाठी उत्तम आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते अजमेर जवळच्या पुष्कर इथं १०५ व्या जाट परिषदेला संबोधित करत होते. नव्या पिढीमध्ये नैतिकता रुजवण्याचं आणि त्यांना योग्य मार्ग दाख...

November 14, 2024 8:32 PM

views 12

भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल – राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.    जनजातीया गौरव दिवसांनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज देशवासीयांना संदेश दिल...

November 14, 2024 8:24 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. या महोत्सवाची संकल्पना प्रगतीशील भारतासाठी शांतता आणि सौहार्द अशी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्दिष्ट बोडोलँडसह आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्था...

November 14, 2024 8:01 PM

views 6

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या सहामाहित भारताच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली. गेल्यावर्षी याच काळात ४३६ अब्ज ४८ कोटी डॉलर्सची निर्यात झाली होती, ती यावेळी ४६८ अब्ज २७ कोटी डॉलर्सवर पोचली. ही वाढ ७ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

November 14, 2024 7:53 PM

views 24

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांकरता मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गिरीदिह, ब...

November 14, 2024 3:52 PM

views 5

चलनवाढीचा दर ऑक्टोबर महिन्यात २.३६ टक्के

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ऑक्टोबर महिन्यात २ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर १ पूर्णांक ८४ होता टक्के होता. खाद्यपदार्थ, कांदे, बटाट्याच्या किंमती वाढल्यानं चलनवाढीचा दर वाढला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.