राष्ट्रीय

November 16, 2024 8:02 PM November 16, 2024 8:02 PM

views 5

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दुपारी पक्षाच्या कार्यकारिणीकडे राजीनामा दिला. पक्ष प्रवक्ता दलजीत सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

November 16, 2024 7:56 PM November 16, 2024 7:56 PM

views 10

छत्तीसगढमधे सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगढमधे नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुझमाड इथे आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. यात २ महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय चकमकीच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत २ सुरक्षा जवानही जखमी...

November 16, 2024 6:52 PM November 16, 2024 6:52 PM

views 16

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण – सभापती ओम बिर्ला

देशात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्यात लेखा परीक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत चौथ्या लेखा परीक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सार्वजनिक संपत्तीचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठीच केला जाईल य...

November 16, 2024 6:39 PM November 16, 2024 6:39 PM

views 9

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक-ECI

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदाना दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचं पूर्व-प्रमाणीकरण आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगानं राजकीय प्रचार जाहिरातींसाठी नियमावली ठरवून दिली आहे. यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाण...

November 16, 2024 6:34 PM November 16, 2024 6:34 PM

views 51

प्रचारादरम्यान आदर्श आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी BJP आणि Congress अध्यक्षांवर ECI च्या नोटिसा

महाराष्ट्र आणि झारखंडमधे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन होत नसल्याच्या तक्रारी भाजपा आणि काँग्रेसनं एकमेकांविरोधात दाखल केल्यानंतर आज निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वेगवेगळ्या नोटिसा बजावल्या. सोमवारी दुपारी एक व...

November 15, 2024 7:59 PM November 15, 2024 7:59 PM

views 11

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. या निमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं...

November 15, 2024 3:48 PM November 15, 2024 3:48 PM

views 6

आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

आपलं सरकार आदिवासी समाजाचा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जमुई इथल्या जाहीरसभेला ते संबोधित करत होते. धरती आबा जनजाती ग्रामउत्कर्ष अभियानांतर्गत आदिवासी गावांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च केले जातील, अशी...

November 15, 2024 7:35 PM November 15, 2024 7:35 PM

views 11

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व...

November 15, 2024 12:03 PM November 15, 2024 12:03 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु नानक यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना, विशेषत: शीख समुदायाला राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात शुभेच्छा दिल्या. गुरु नानकजी यांची प्रेम, विश्वास, सत्य आणि त्यागाची शिकवण सर्वांना नैतिकतेबद्दल ...

November 15, 2024 1:39 PM November 15, 2024 1:39 PM

views 3

वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून ऑनलाईन

दिल्ली एनसीआर भागातल्या हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर स्थितीत असून आज सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४२० इतक्या अतिगंभीर स्थितीत होता. पुढचे दोन दिवस त्यात धुक्याची भर पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वायू प्रदुषणाच्या वाढत्या पातळीमुळे नवी दिल्लीतल्या सर्व प्राथमिक शाळा आजपासून पुढचे आदेश ...