राष्ट्रीय

November 18, 2024 2:46 PM November 18, 2024 2:46 PM

views 5

आम आदमी पार्टीचे कैलाश गहलोत यांचा भाजपात प्रवेश

दिल्लीच्या आम आदमी पार्टी मंत्रिमंडळाचे माजी सदस्य कैलाश गहलोत यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरलाल, पक्ष उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांचं स्वागत केलं. आम आदमी पार्टीच्या धारणांपेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ...

November 18, 2024 1:00 PM November 18, 2024 1:00 PM

views 10

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. ...

November 18, 2024 1:30 PM November 18, 2024 1:30 PM

views 6

आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त

ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिकडेच सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २९ ऑक्टोबरला योजनेचं उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ३ आठव...

November 18, 2024 10:01 AM November 18, 2024 10:01 AM

views 12

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्र...

November 18, 2024 9:42 AM November 18, 2024 9:42 AM

views 10

झारखंड विधानसभा : निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर खासगी वाहनांवर बॅनर वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितलं. झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्र असून ३१ मतदान संघांमध्ये आज...

November 18, 2024 10:02 AM November 18, 2024 10:02 AM

views 12

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपू...

November 17, 2024 8:15 PM November 17, 2024 8:15 PM

views 7

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी आदरांजली

पंजाब केसरी नावानं ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी देशानं आज त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त, पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या लालाजींच्या मूळ गावी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

November 17, 2024 8:09 PM November 17, 2024 8:09 PM

views 3

मणिपूरमध्ये, बिरेन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा नॅशनल पिपल्स पार्टीचा निर्णय

मणिपूरमध्ये, नॅशनल पिपल्स पार्टीनं एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. नॅशनल पिपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. राज्यातली सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून गेल्या काही दि...

November 17, 2024 8:01 PM November 17, 2024 8:01 PM

views 2

वंचित समुदायाच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात कायद्याची भूमिका महत्वपूर्ण – सर्वोच्च न्यायालय

वंचित समुदायाच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात कायद्याची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. वंचित समुदायाचं  सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेनं पाऊल’ या विष...

November 17, 2024 8:02 PM November 17, 2024 8:02 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं ...