राष्ट्रीय

January 3, 2025 3:01 PM

views 75

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे.   सावित...

January 3, 2025 10:27 AM

views 23

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वे...

January 3, 2025 9:59 AM

views 55

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्हयामध्ये केलं. राहाता तालुक्यातल्या बाभळे...

January 3, 2025 9:51 AM

views 10

गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्क्यांची वाढ- कामगार मंत्रालयाची माहिती

गेल्या दशकभरात देशात रोजगाराच्या प्रमाणात 36 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 ते 2024 या कालावधीत 17 कोटी अतिरिक्त रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षी देशात चार कोटी 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या दशकभरात कृषी क्ष...

January 3, 2025 9:47 AM

views 24

भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकासांठी विविध केंद्रीय मंत्र्याची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडणुकांसाठी निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची गुजरातसाठीनिवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून शिवराजसिंह यांच्य...

January 2, 2025 8:30 PM

views 30

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी टोळी उघडकीस

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात १२ बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आ...

January 2, 2025 8:27 PM

views 12

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं सुरुवात

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. यंदा या ऊरुसाचं ८१३ वं वर्षे असून देशा-परदेशातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात.   केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज मझहार शरीफवर चादर चढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीन...

January 2, 2025 8:24 PM

views 10

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी कार्यगटाची स्थापना 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०११ -१२ च्या ऐवजी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर १८ सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्या...

January 2, 2025 8:19 PM

views 22

‘डीआरडीओनं संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात’

डीआरडीओ, अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आपल्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं डीआरडीओ च्या ६७ व्या स्थापना दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या ...

January 2, 2025 8:15 PM

views 26

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.