राष्ट्रीय

November 12, 2025 6:29 PM November 12, 2025 6:29 PM

views 10

आरोग्य मंत्रालयाची हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांसाठी हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.  यानुसार सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधे चेस्ट क्लिनीक उभारायला सांगितलं आहे. तसंच नागरिकानी अति प्रदूषण असलेले रस्ते, अति वर्दळी...

November 12, 2025 7:58 PM November 12, 2025 7:58 PM

views 108

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्या...

November 12, 2025 3:25 PM November 12, 2025 3:25 PM

views 32

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले

भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी आज भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांच्यासह आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षते...

November 12, 2025 1:40 PM November 12, 2025 1:40 PM

views 112

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 12, 2025 1:30 PM November 12, 2025 1:30 PM

views 21

आज ‘जागतिक न्यूमोनिया दिवस’

आज जागतिक न्यूमोनिया दिवस आहे. या निमित्तानं, प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी  केंद्रसरकारनं मजबूत आरोग्य प्...

November 12, 2025 1:20 PM November 12, 2025 1:20 PM

views 26

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांनी आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली....

November 12, 2025 1:23 PM November 12, 2025 1:23 PM

views 41

सोनं तस्करी प्रकरणी ११ जणांना अटक

सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी डीआरआय, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत ११ जणांना अटक केली. या कारवाईत  ११ किलो ८८ ग्रॅम  सोनं आणि ८ किलो ७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती, अशी माहित...

November 12, 2025 1:23 PM November 12, 2025 1:23 PM

views 17

आज ‘सार्वजनिक प्रसारण सेवा’ दिवस

आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. १९४७ मधे फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी  ऑल इंडिया रेडियोवरुन संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन म्हणून घोषित करण्यात आला.

November 12, 2025 1:22 PM November 12, 2025 1:22 PM

views 911

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान

बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झालं होतं, त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण ६६ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतकं मतदान झालं आहे.  बिहारम...

November 11, 2025 8:13 PM November 11, 2025 8:13 PM

views 16

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे निर्देश

वायू प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या ठोस कारवाईचे अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्री भूपेंदर यादव यांनी आज काही राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना दिले. ते वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. वायू प्रदू...