राष्ट्रीय

January 4, 2025 8:52 PM January 4, 2025 8:52 PM

views 3

उत्तर भागात दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर भागात  दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.  या मार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे ४० गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पाच तास उशीरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली. यात कालिंदी एक्सप्रेस, रेवा एक्सप्रेस, मलाबोधी एक्सप्रेस, कै...

January 4, 2025 9:14 PM January 4, 2025 9:14 PM

views 2

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर प्रधानमंत्र्यांच्या वतीनं चद्दर अर्पण

अजमेर इथल्या  सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेली चद्दर अर्पण करण्यात आली. अजरमेर इथं ८१३ वा उर्स सुरू झाला आहे. हे औचित्य साधत  केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजीजू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं दर्ग्यात चद्दर अर्पण केली. ख्वाजा यांचे कल्य...

January 4, 2025 8:50 PM January 4, 2025 8:50 PM

views 6

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार – धर्मेंद्र प्रधान

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी आज दिली. दिल्ली विश्वविद्यालयात सर्मपण सोहळ्याचं उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.    सशक्त बेटी आणि ई-दृष्टी योजनांचं उद्घाटन प्रधान यांन...

January 4, 2025 8:14 PM January 4, 2025 8:14 PM

views 4

तामिळनाडूमधे झालेल्या स्फोटात  ६ जणांचा मृत्यू, २ जण जखमी

तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यात सत्तूर भागात आज एका फटाक्याच्या  कारखान्यात झालेल्या स्फोटात  ६ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. फटाके तयार करत...

January 4, 2025 8:13 PM January 4, 2025 8:13 PM

views 10

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी-अश्विनी वैष्णव

विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या काळात ताण न घेता ध्यासवृत्ती जोपासावी असा सल्ला  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. नवी दिल्लीत आयोजित एक्झॅम वॉरिअर्स कला महोत्सवात आज त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं. अभिनेता आणि खेळाडू स्वतःच्या कामाचा ध...

January 4, 2025 8:13 PM January 4, 2025 8:13 PM

views 13

जम्मू काश्मीरमध्ये येत्या सोमवारपर्यंत जोरदार हिमवृष्टी-हवामान विभाग

जम्मू काश्मीर मध्ये आज पासून येत्या सोमवार पर्यंत जोरदार हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू मध्ये पुढील काही दिवस सकाळच्या वेळात धुक्याचं साम्राज्य असेल तर दिवसा हवामान ढगाळ राहील.  काश्मीरमध्ये ५ आणि ६ तारखेला...

January 4, 2025 7:27 PM January 4, 2025 7:27 PM

views 7

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल ‘तेजस्विनी’ उत्तराखंड बागेश्वर इथं पोहोचली

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची मशाल 'तेजस्विनी' आज उत्तराखंडमधील बागेश्वर इथं पोहोचली. तिथले जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी या मशालीचं स्वागत केलं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना या महिन्याच्या अखेरीला सुरुवात होईल. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन केलं गेलं आहे. उत्तराखंडचे...

January 4, 2025 6:31 PM January 4, 2025 6:31 PM

views 3

सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार- शिवराज सिंग चौहान

उत्पादक आणि उपभोक्ता राज्यांमधली दराची तफावत दूर करण्यासाठी सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी ...

January 4, 2025 6:29 PM January 4, 2025 6:29 PM

views 6

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची २९ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी दिल्ली निवडणुकांसाठी नवी दिल्लीत भाजपनं आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांची तर कलकाजी इथल्या जागेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबरोबरच,  या निवडणुकांसाठी आपल्या पहिल्या २९ उमेदवारांची यादी ...

January 4, 2025 3:06 PM January 4, 2025 3:06 PM

views 15

दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली

दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली असून आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सरासरी ए क्यू आय अर्थात वायू गुणवत्ता निर्देशांक ३८५ इतका झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार दिल्लीच्या काही भागांत वातावरण अत्यंत खराब म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक ४०० इतक्या निचांकी पात...