राष्ट्रीय

January 27, 2025 9:35 AM

views 4

श्रीलंकेच्या नौदलाकडून ३४ भारतीय मच्छिमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलानं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३४ भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. बेकायदेशीर मासेमारीसाठीच्या तीन ट्रॉलिंग बोटीही जप्त केल्या आहेत. या बोटींनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेचे उल्लंघन केल्याबद्दल त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यापूर्वीही, ४१ भारतीय मच्छिमारांना देशात परत पाठवण्यात ...

January 27, 2025 1:21 PM

views 17

मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

११ व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून मस्कतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भेटीदरम्यान गोयल ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस बिन मोहम्मद बिन मुसा अल युसेफ यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांचे मंत्री व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक आर्...

January 27, 2025 9:34 AM

views 32

महाकुंभमेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित

येत्या २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेला क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं...

January 26, 2025 8:29 PM

views 24

अरविंद केजरीवाल यांनी जनतेला आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवलं – गृहमंत्री अमित शाह

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या जनतेला आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवल्याची टीका भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. नवी दिल्लीत नरेला इथं ते प्रचारसभेला संबोधित करत होते. केजरीवाल यांच्या राजवटीत दिल्लीतल्या पायाभूत सुविधांचा ऱ्हास झाला, दिल्ली गेल्या दहा वर्षांत पाणीपुरवठा आण...

January 26, 2025 8:14 PM

views 10

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचं निधन

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचे बंगळूरु इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. चेरियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हृदयरोगशास्त्रातील त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील असं प्रधानमंत्री म्हणाले. बेंगळुरूमध्ये एका लग्न समारंभात ते अचानक बेशु...

January 26, 2025 8:07 PM

views 22

मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित विशेष पाहुण्यांशी संवाद

७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथे संवाद साधला. या सर्व पाहुण्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मन की बात कार्यक्रमातून समाजासाठी अथकपणे काम करत असल्याचा उल्लेख केला असं वैष्णव यांनी आकाशवाणी प्र...

January 26, 2025 8:03 PM

views 19

तेलंगणामध्ये रस्ता अपघातात ५ जण ठार, ६ जखमी

तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्यात मामुनरु महामार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात ५ जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.    लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा एक ट्रक मधल्या सळ्या बांधलेली दोरी अचानक तुटल्यानं चालकाचं ट्र्कवरच नियंत्रण सुटलं आणि तो व...

January 26, 2025 7:26 PM

views 29

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत ध्वजारोहण संपन्न

७६वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहानं देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. ...

January 26, 2025 2:46 PM

views 23

मध्य प्रदेशात कार अपघातात तीन भाविक ठार

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात पुण्याहून महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज इथं निघालेले तीन भाविक ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर जबलपूर जिल्ह्यात कालादेही इथं वेगात निघालेल्या कारवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.    

January 26, 2025 2:41 PM

views 8

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.