राष्ट्रीय

January 8, 2025 1:31 PM January 8, 2025 1:31 PM

views 2

आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

आसाममध्ये दिमा हासाओ जिल्ह्यातल्या उमरंगसो इथे पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतीय नोदलाच्या २१ पॅरा डायव्हर्सने बाहेर काढला. ही व्यक्ती नेपाळची नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना बाहेर काढण्याचं काम अद्याप सुरू आहे.   ही कोळसा खाण मेघालय...

January 8, 2025 1:14 PM January 8, 2025 1:14 PM

views 3

राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यात येणार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारनं राजघाट परिसरातल्या राष्ट्रीय स्मृती संकुलामध्ये एक जागा निश्चित केली आहे. दिवंगत माजी राष्ट्रपतींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

January 8, 2025 10:39 AM January 8, 2025 10:39 AM

views 40

इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे नवे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्याकडून 14 जानेवारी रोजी नारायणन पदभार स्वीकारतील.   नारायणन सध्या केरळमधील वालियामाला इथल्या इस्रोच्या एलपीएससी म्हणजे लिक्विड प्र...

January 8, 2025 10:31 AM January 8, 2025 10:31 AM

views 4

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सरकारी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं अनावरण

माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल दिल्लीत केंद्र सरकारच्या नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करण्यात आलं. परिवर्तनवादी प्रशासनाच्या तत्वांना अधोरेखित करणारी जनभागीदारी से जनकल्याण ही नव्या दिनदर्शिकेची संकल्पना आहे.   गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात परिवर्तनात्मक प्रश...

January 8, 2025 10:26 AM January 8, 2025 10:26 AM

views 17

परराष्ट्र व्यवहार मंत्री कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर कालपासून पाच दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असून, त्यांनी ओडिशाच्या पुरी आणि भुवनेश्वर इथल्या विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या.   जयशंकर यांनी कोनार्कच्या सूर्य मंदीर, जगन्नाथ मंदीर, धौली शांती स्तूप तसंच भुवनेश्वर इथं 11 व्या शतकातल्या लिंगराज मंदिरालाही भेट ...

January 8, 2025 9:59 AM January 8, 2025 9:59 AM

views 14

आंध्र प्रदेशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम् इथं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 1 लाख ...

January 8, 2025 9:29 AM January 8, 2025 9:29 AM

views 2

18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आजपासून भुवनेश्वर इथं आयोजन

18 व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात होत आहे. यासाठी 50 देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या युवा प्रवास...

January 8, 2025 9:13 AM January 8, 2025 9:13 AM

views 10

देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4 दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 6.4 दशांश टक्के राहण्याचा अंदाज देशाचं 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच्या देशांतर्गत सकल उत्पादन वाढीचा दर सहा पूर्णांक ४ दशांश टक्के राहिल असा प्राथमिक अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल याबाबतची आक...

January 7, 2025 8:14 PM January 7, 2025 8:14 PM

views 5

मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य-मुख्य निवडणूक आयुक्त

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली आकडेवारी यात तफावत होती. पण त्यात कुठलीही फेरफार झाली नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला. मतदानाची आकडेवारी बदलणे अशक्य आहे. काही मतदान केंद्रांवरुन अ...

January 7, 2025 8:13 PM January 7, 2025 8:13 PM

views 10

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताची तयारी सुरु

येत्या २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताने तयारीला सुरुवात केली असून खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, असं केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या १५२व्या मिशन ऑलिम्पिक सेल बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते....